फॉलो करा सोपी ट्रिक
जर तुम्हाला एखाद्या ग्रुप किंवा चॅटमधील फोटो किंवा व्हिडीओ थेट गॅलरीमध्ये जाऊ नये असं वाटतं तर तुम्हाला त्या स्पेसफिक ग्रुप किंवा चॅटमध्ये जाऊन Visibility बदलावी लागेल. हे करण्याकरता तुम्हाला खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यात सर्वात आधी व्हॉट्सॲप ओपन करा. त्यानंतर मेन स्क्रिनवर सर्वात वर असणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन Chats ऑप्शन निवडावा लागेल. त्यानंतर चॅट्समधील सेटिंग्समध्ये Media Visibility हा ऑप्शन दिसेल. त्याला डिसेबल करावं लागेल. ज्यानंतर फोटो आणि व्हिडीओ थेट गॅलरीत दिसणं बंद होईल.
लवकरच व्हॉट्सॲपवर येणार खास फीचर
व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअरिंगचं एक दमदार फीचर येत्या काळात व्हॉट्सॲप आणणार आहे. कंपनीने अलीकडेच बीटा चाचणीसाठी व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंगचे हे खास फीचर जारी केलं. या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल करताना कॉलवरील इतर सहभागी असणाऱ्यांना त्यांच्या स्क्रीनला शेअर करण्याची म्हणजेच त्यांच्या फोनची स्क्रिन दाखवण्याची सुविधा मिळेल. असं फीचर आतातरी झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्काईप सारख्या ॲप्सवर आहे. जे ऑफिस युजसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
वाचा : भारीच! उन्हात गेल्यावर या फोनचा कलर आपोआप बदलणार, १६ जीबीचा तगडा रॅम, ८७९९ रुपये किंमत