जगभरातील मराठी उद्योजकांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; तरुणांसाठी केलं खास आवाहन

हायलाइट्स:

  • आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स (आमी) परिवारासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ई-संवाद
  • ‘विदेशातील मराठी उद्योजक, व्यावसायिक, तज्ज्ञ यांच्या समवेत महाराष्ट्र शासन समन्वयासाठी प्रयत्न करेल’; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
  • मराठी तरुणांसाठीही उद्योजकांना केलं महत्त्वपूर्ण आवाहन

मुंबई : जगभरातील उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स (आमी) परिवारासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी ई-संवाद साधला. ‘कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य-औषध या क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी, मराठी तरुणांना जगाच्या स्पर्धेत उभे करण्यासाठी पुढाकार घ्या. आपण एकमेकांला सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू,’ असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

या संवादात उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, आमी परिवाराचे संयोजक संतोष करंडे (अमेरिका), ज्येष्ठ विचारवंत संदीप देसले (इजिप्त), अलअदिल ट्रेडिंग कंपनीचे प्रमुख, उद्योजक डॉ. धनंजय दातार(दुबई), उत्कर्ष बल्लाळ (ओमान), विशाल गायकवाड (रियाध), संजय पाटील (कतार), लेफ्टनंट कर्नल सचिन टिळेकर (ऑस्ट्रेलिया), तेजस्विनी डोळस (अबुधाबी), मृदुला जोशी (कॅनडा), धवल नांदेडकर (फुजैराह), प्रीती पाटील (युनायटेड किंगडम), प्रज्ञा आगवणे (शारजाह), ज्योती नेने-त्रिवेदी (केनिया), मोहम्मद नदीम (सऊदी अरेबिया), डॉ. अनघा कुलकर्णी (बहारीन), सुशांत सावर्डेकर (दोहा), उल्का नागरकर (शिकागो) सहभागी झाले.

cji ramana : संसदेतील गदारोळावर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांची मार्मिक टिप्पणी; म्हणाले…

‘जगभरातील मराठी माणूस महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे येत आहे’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जगाच्या कानाकोपऱ्यातून जय महाराष्ट्र ऐकू येतो आहे, हा अंगावर रोमांच आणणारा क्षण आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जगभरातून आपण शुभेच्छा देत आहात. मराठी माणसाने जग व्यापून टाकले आहे, हा अनोखा अनुभव आहे. आपण मायभूमीपासून दूर गेलात, पण तुमची पाळेमुळं इथचं आहेत. मनाने इथेच आहात, याचा आनंद आहे. जगभरातील मराठी माणूस महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे येतो आहे, हे आशा पल्लवित करणारे आहे. मराठी माणूस जगातील विविध क्षेत्रात मोठ-मोठ्या पदापर्यंत पोहोचला आहे. आपल्या कौशल्याने त्या-त्या देशाच्या अर्थकारणाला हातभार लावतो आहे. तुम्ही आता जगभरात आपल्या बळावर स्थान निर्माण केले आहे. त्यांचा फायदा आपल्या मराठी मुलांना, तरुणांना व्हावा. त्यांना संघर्ष करावा लागू नये, त्याची भविष्याची वाटचाल सुकर व्हावी यासाठी आपल्याला पुढाकार घेता येईल. विदेशात भविष्याची चाहूल लवकर लागते. त्यादृष्टीने पावले उचलली जातात. त्या अनुषंगाने आपला त्या-त्या क्षेत्रातील अनुभव- अभ्यास महाराष्ट्रालाही उपयुक्त ठरू शकतो, असंही त्यांनी सांगितले.

रेशन धान्याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी केलं महत्त्वपूर्ण आवाहन

शेतकऱ्यांविषयी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाराष्ट्रात शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान आणि नवीन उद्योग संकल्पना यांच्या स्वागताचे धोरण आहे. त्यातून विदेशातील मराठी उद्योजक, व्यावसायिक, तज्ज्ञ यांच्या समवेत महाराष्ट्र शासन समन्वयासाठी प्रयत्न करेल, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, टशिक्षणामध्ये आम्ही नवनवे प्रयोग करत आहोत. मुंबई मनपा शाळांच्या गुणवत्तावाढीमुळे आता प्रवेशासाठी रांग लागू लागली आहे. या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नव्या संकल्पनांचेही स्वागत केले जाईल. आपला शेतकरी निसर्गाच्या भरवशावर आपल्या आयुष्याची गुंतवणूकच शेतीत करतो. पण तो पावसाच्या अनियमिततेमुळे हताश होतो. त्याला कधी दुष्काळाचा, तर कधी अतिवृष्टीचा फटका बसतो. मेहनती शेतकऱ्याला या चक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या मालाला हमी नव्हे तर हमखास भाव मिळेल. त्याच्यासाठी चांगली बाजारपेठ कशी उपलब्ध होईल. उद्योग जसा आखीव-रेखीव असतो, तसेच त्याला संघटीत करण्याचा प्रय़त्न आहे. त्याला दर्जेदार-गुणवत्तेचा पीक घेण्यासाठी प्रशिक्षित करावे लागणार आहे. ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम भोगतो आहे. त्यासाठी आता आम्ही आपण ई-व्हेईकल्सचे धोरणही आणले आहे. अशा कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य सुविधा, औषध या क्षेत्रात आपल्याला एकत्र येऊन काम करता येईल. त्यासाठीच्या सूचना, नव्या प्रकल्प, संकल्पांचे स्वागत आहे. मराठी माणूस काय करू शकतो, हे तुम्ही दाखवून दिले आहे. आता महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे प्रयत्न करू. तुम्ही भरारी घेतली आहे, आता नव्या पिढीतील तरुणांना गरुड भरारीसाठी पंख देण्यासाठी पुढे या,’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गत दीडवर्षातील महाराष्ट्रातील कोविडशी झुंज, वादळ आणि अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्राला बसलेला पुराचा फटका यांचा उल्लेख करून, या आव्हानांवर मात करून महाराष्ट्र पुढे जात असल्याचे सांगितले.

Source link

businesscm uddhav thackerayउद्योग क्षेत्रउद्योजकमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment