समोरच्यानं WhatsApp वर मेसेज पाठवून केला डिलीट, आता तो देखील मेसेज पाहता येणार, वाचा ट्रिक

नवी दिल्ली :How to Read deleted Messages on WhatsApp : सध्या बहुतांश स्मार्टफोन वापरकर्ते मेसेजिंगसाठी व्हॉट्सॲप हेच ॲप वापरतात. वापरकर्त्यांना त्यांच्या गरजांनुसार व्हॉट्सॲप देखील अनेक सुविधा पुरवत आहे, ज्यामध्ये आता एक खास फीचर मिळत असून या ट्रिकच्या मदतीने डिलीट केलेले मेसज देखील पाहता येणार आहेत.
अनेकदा काहीजण समोरच्याला पाठवलेला मेसेज त्याने पाहण्यापूर्वीच डिलीट करतात. ज्यानंतर समोरच्या युजरच्या चॅटबॉक्समध्ये फक्त मेसेज सिम्बॉल दिसतो आणि मेसेज डिलीट झाल्याचे दिसून येते. पण स्मार्टफोनमध्ये एक अशी सुविधा आहे, ज्याच्या मदतीने डिलीट केलेले मेसेजही पाहता येतात. तर नेमकी ही ट्रिक कशी वापरता येणार आहे. ते पाहूया…

नोटीफिकेशन हिस्ट्री

आजकाल जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये नोटिफिकेशन हिस्ट्री किंवा नोटीसेव्ह या नावाने नोटिफिकेशन सेव्ह करण्याची सुविधा आहे. तर हे फीचर तुमच्या फोनमध्ये येणाऱ्या सर्व नोटिफिकेशन्स रेकॉर्ड करते. त्यामुळे एकदा समोरच्याने मेसेज पाठवला तर आधी तो नोटीफिकेशनमध्ये जातो, त्यामुळे नंतर समोरच्याने मेसेज मेसेज डिलीट केला तरी तुम्ही या ऑप्शनवर जाऊन तो मेसेज वाचू शकता. हा पर्याय WhatsApp सह Instagram आणि इतर सोशल मीडिया ॲप्ससाठी देखील कामी येतो.

कसा कराल वापर?
जर कोणी तुम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज केला असेल आणि तुम्ही तो वाचण्यापूर्वी तो डिलीट केला असेल तर तुम्ही या फीचरची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनचा नोटिफिकेशन हिस्ट्री हा पर्याय चालू करावा लागेल. यासाठी फोनची सेटिंग ओपन करा आणि Notifications & Status Bar या पर्यायावर टॅप करा. यानंतर तुम्हाला More Settings च्या पर्यायावर जावे लागेल. तिथून नोटिफिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवर टॅप करा आणि तो एनाबेल करा. आता तुमच्या फोनमध्ये जे काही नोटिफिकेशन येतील ते नोटिफिकेशन हिस्ट्री हे फीचर रेकॉर्ड करेल आणि तुम्ही ते नंतरही पाहू शकता.
यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री ऑप्शनवर जावे लागेल आणि येथून व्हॉट्सॲप चॅटवर टॅप करावे लागेल. तुम्हाला वेळेनुसार सर्व WhatsApp संदेश दिसतील. लक्षात ठेवा की या फीचरच्या मदतीने तुम्ही फक्त टेक्स्ट मेसेज पाहू शकता. इमेज डिलीट केल्यानंतर ते पाहता येणार नाही.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

Source link

WhatsAppwhatsapp delete messageswhatsapp messagesWhatsapp tricksव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप मेसेज
Comments (0)
Add Comment