आधार कार्ड हे सध्याचे सर्वात महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट समजले जाते. सर्वांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. परंतु, तुमचे आधार कार्ड जर १० वर्ष जुने झाले असेल म्हणजेच तुम्ही आधार कार्ड १० वर्षापूर्वी बनवले असेल तर तुम्हाला ते आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. सरकारकडून हे बंधनकारक करण्यात आले आहे.
१४ जून पर्यंत अखेरची संधी
जर तुमचे आधार कार्ड १० वर्ष जुने झाले असेल तर तुम्हाला १४ जून पूर्वी म्हणजेच अवघ्या दोन दिवसात फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. तर १४ जून नंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये फी द्यावी लागेल. सरकारने १४ जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. UIDAI ने १५ मार्च ते १४ जून पर्यंत आधारला ऑनलाइन अपडेट करण्यासाठी कोणतीही फी ठेवली नाही. यूजर्सला हे अपडेट फ्री मध्ये करता येणार आहे.

वाचाः आता बहाणा नको! अर्ध्या किंमतीत मिळतेय वॉशिंग मशीन, १४ जूनपर्यंत ऑफर
कसे ऑनलाइन कराल आधारला अपडेट
- सर्वात आधी तुम्ही आधारच्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
- या ठिकाणी वर दिलेल्या myAadhaar ऑप्शनवर जा. यावर जाऊन क्लिक करा.
- यानंतर अपडेट आधार सेक्शन क्लिक करा.
- नंतर यूजरला आपला आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल.
- यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. यावरून मोबाइल नंबर व्हेरिफाय होईल.
- यानंतर तुम्ही तुमचा पत्ता, फोन नंबर, नाव किंवा जन्म तारीख सारखे बदल करू शकता.
- या ठिकाणी माहिती अपडेट करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्राची फोटो कॉपी अपलोड करावी लागेल.
- यानंतर कन्फर्म आणि सबमिट बटनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर एक यूनिक अपडेट रिक्वेस्ट नंबर येईल. यावरून आधारला अपडेटला ट्रॅक करता येऊ शकते.
नोटः आधार अपडेट करण्यासाठी कोणतीही फी नाही, परंतु, तुम्हाला ही प्रक्रिया ऑनलाइन करावी लागेल.
वाचाः ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 14 Plus, पाहा ऑफर्स
वाचाः अखेर ट्रॅफिक पोलिसवाले कसे काढतात तुमच्या बाइक किंवा कारचा क्लियर फोटो?, पाहा या टिप्स