पृथ्वीच्या गर्भात आहेत कितीतरी रहस्य, शास्त्रज्ञांना आढळले माउंट एव्हरेस्टपेक्षा ४ पट मोठे खडक

नवी दिल्ली : What is Under the Earth : पृथ्वीच्या गर्भात काय दडले आहे, हे जाणून घेणे पृथ्वीवर राहणाऱ्यांसाठी अगदी उत्सुकतेचा विषय असतो. त्यात सर्वचजण जाणतात पृथ्वीच्या गर्भात कितीतरी रहस्य आहेत. शास्त्रज्ञ देखील या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न कायमच करत असतात. दरम्यान या रहस्यांपैकी एका मोठ्या रहस्याचा आता खुलासा होत असून पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली माउंट एव्हरेस्टपेक्षा तब्बल ४ ते ५ पट उंचीचे खडक आढळून आले आहेत. आहेत. ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या टीमने हा शोध लावला असून याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

पृथ्वीचे प्रामुख्याने तीन थर आहेत. यामध्ये, सर्वात वरच्या थरावर आपण सर्वजण राहतो. इथेच पाणी, माती, जंगल असं सारंकाही आहे.याला क्रस्ट म्हणतात. याच्या खाली खनिजं, तेल हे सारंकाही असून अखेरच्या तिसऱ्या थरात म्हणजे गर्भात सर्वकाही द्रव आहे. तिथे खूपच उष्णता असल्याने त्यामुळे तिथे सारंकाही लिक्विड फॉर्ममध्येच आहे. पण आता शास्त्रज्ञांना दुसऱ्या आणि तिसऱ्या थरादरम्यान माउंट एव्हरेस्टपेक्षा ४ पट उंच खडक सापडले आहेत. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या टीमने यासाठी भूकंपशास्त्र तंत्राचा वापर केला. अंटार्क्टिकाच्या भूकंपविज्ञान केंद्रातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्बल हे खडक २९०० किमी खाली आहेत. इथूनच गाभा सुरू होतो असं म्हटलं जात आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या खडकांमध्ये फारच कमी हालचाल आहेत आणि म्हणूनच ते अद्याप समोर आलेले नाहीत.

तब्बल ३८ किमी उंच आहेत हे खडक
अहवालात शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की हे खडक तब्बल ३८ किलोमीटरपर्यंत उंच आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वोच्च पर्वत एव्हरेस्टची उंची केवळ ८.८ किलोमीटर आहे. यांच्या निर्मितीबद्दल, शास्त्रज्ञांना असं वाटतं की, हे खडक बर्याच काळापासून याठिकाणी उपस्थित आहेत. हे बेसाल्ट खडक असू शकतात आणि ते समुद्राच्या तळावर सापडलेल्या इतर सामग्रीच्या मिश्रणाने बनलेले असू शकतात. पृथ्वीच्या गर्भातून उष्णता कशी सोडली जाईल याचा शास्त्रज्ञ शोध घेत असून या प्रक्रियेत या खडकांची महत्त्वाची भूमिका असू शकते.

वाचा : Asteroid Near Earth : सावधान! ३ लघुग्रह पृथ्वीच्यादिशेने, तब्बल १५०० फुट आकार असण्याची शक्यता

Source link

earthmount everestmountains under earthnaturescience newsunder earthपृथ्वीमाउंट एव्हरेस्ट
Comments (0)
Add Comment