काही मिळालेल्या माहितीनुसार, आयफोनच्या नवीन मॉडल्समध्ये जे प्रो मॉडल्स असतील त्यात iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max च्या किंमतीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या सीरीजची आयफोन १४ सीरीज सोबत तुलना केल्यास iPhone 14 सीरीजची सुरुवातीची किंमत ७९९ डॉलर आहे तर आयफोन १४ प्लसची किंमत ८९९ डॉलर आहे. आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्सची किंमत अनुक्रमे ९९९ डॉलर आणि १०९९ डॉलर असेल.
वाचाः अखेर ट्रॅफिक पोलिसवाले कसे काढतात तुमच्या बाइक किंवा कारचा क्लियर फोटो?, पाहा या टिप्स
काय असू शकते नवीन किंमत
जुन्या किंमतीच्या तुलनेत आयफोन १५ प्रोची सुरुवातीची किंमत ११९९ डॉलर म्हणजेच ९९ हजार रुपये असू शकते. तर प्रो मॅक्स मॉडलची किंमत १२९९ डॉलर म्हणजेच १ लाख ७ हजार रुपये असू शकते.
वाचाः ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 14 Plus, पाहा ऑफर्स
संभावित किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, या वेळी कंपनी टाइप सी पोर्ट देवू शकते. सोबत Dynamic Island फीचर iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये सुद्धा दिले जाऊ शकते. हा फोन क्वॉलकॉम मॉडम चिपसेट सोबत येऊ शकतो. iPhone 15 मॉडल्स मध्ये A16 चिपसेट दिले जाण्याची शक्यता आहे. iPhone 15 Pro मॉडल्स मध्ये A17 चिपसेट दिले जाण्याची शक्यता आहे. iPhone 15 Pro Max मध्ये पेरिस्कोप लेंस टेक्नोलॉजी दिली आहे. हा फोन जबरदस्त झूम कॅपेबिलिटीज सोबत येऊ शकतो.
वाचाः आता बहाणा नको! अर्ध्या किंमतीत मिळतेय वॉशिंग मशीन, १४ जूनपर्यंत ऑफर