हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ७९७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ७१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण १३० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यात आज करोनाच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत मोठी घट झाली असून मृत्यूंच्या संख्याही किंचित घटली आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज दिवसभरात एकूण १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार ७९७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज एकूण ३ हजार ७१० इतके रुग्ण बरे झाले आहेत. (maharashtra registered 4797 new cases in a day with 3710 patients recovered and 130 deaths today)
आज राज्यात झालेल्या १३० रुग्णांच्या मृत्यूंनंतरही राज्याचा मृत्यूदर आता २.११ टक्क्यांवरच आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८९ हजार ९३३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित वाढ
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६४ हजार २१९ इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ७४८ इतका आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ७ हजार ५४७ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ७ हजार ००४ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ४१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोलापुरात ५ हजार ४७४ इतके रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांबाबत केले ‘हे’ वक्तव्य
मुंबईत ३०९६ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या किंचित कमी होत ती ३ हजार ०९६ वर आली आहे. तर, रायगडमध्ये १ हजार १६०, रत्नागिरीत १ हजार ७१०, सिंधुदुर्गात १ हजार ४६४, बीडमध्ये १ हजार ४१२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ११५ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- बीकॉमच्या विद्यार्थ्यानेच मुंबई विद्यापीठाला दिली बॉम्बस्फोटाची धमकी
नंदुरबार, भंडारा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५४२, नांदेडमध्ये ही संख्या ४९ इतकी आहे. जळगावमध्ये ३१३, नागपूर जिल्ह्यात ही संख्या २०७ इतकी झाली आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १६ इतकी आहे. तसेच, अमरावतीत ही संख्या ५३ वर खाली आली आहे. धुळ्यात ही संख्या ४ इतकी आहे. नंदुरबार, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी १ सक्रिय रुग्ण आहे.
क्लिक करा आणि वाचा- काही जिल्ह्यांत कमी लसपुरवठा का?, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने सांगितले कारण
३,५९,६४२ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ०९ लाख ५९ हजार ७३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ९२ हजार ६६० (१२.५४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ५९ हजार ६४२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.