का होत आहे विरोध?
स्ट्रीमिंग कंपन्यांनी सांगितले की, या नियमानंतर हॉलिवूड आणि बॉलिवूड वेब शोजला लाखो आकड्यात एडिट करावे लागणार आहे. ओटीटी कंटेंट जनरेट कंपन्याकडून सांगितले जात आहे की, त्याच्या प्लॅटफॉर्मवर अनेक भाषेत कंटेट उपलब्ध आहेत. या कारणामुळे प्रत्येक भाषेत अलर्ट देताना काही समस्या येऊ शकतात. या स्थितीत ओटीटी कंपन्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करीत आहेत.
वाचाः आता बहाणा नको! अर्ध्या किंमतीत मिळतेय वॉशिंग मशीन, १४ जूनपर्यंत ऑफर
आदेशाचे पालन न केल्यास कारवाई
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक निर्देश जारी केला आहे. यानुसार, सर्व प्लॅटफॉर्मला तीन महिन्याच्या आत धूम्रपान संबंधी फोटो किंवा व्हिडिओच्या डिस्प्ले दरम्यान अलर्ट द्यावा लागणार आहे. या निर्देशाचे पालन न केल्यास ओटीटी कंटेंट जनरेट कंपन्यांवर कारवाई केली जाईल. एका इंग्रजी न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, ओटीटी कंटेट जनरेट कंपन्या याला क्रिएटर्सच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला मानत आहे.
वाचाः अखेर ट्रॅफिक पोलिसवाले कसे काढतात तुमच्या बाइक किंवा कारचा क्लियर फोटो?, पाहा या टिप्स
आधी आणि नंतर जारी करावा लागेल अलर्ट
नवीन नियमांनुसार, ओटीटी कंपन्याच्या प्रत्येक शोची सुरुवातीला आणि अखेर मध्ये तंबाखूच्या उपयोगा संबंधी अलर्ट द्यावा लागणार आहे. कंपन्याला कमीत की ५० सेकंदाचे तंबाखू विरोधी जाहिरात प्रदर्शित करावी लागणार आहे. ज्यात ऑडियो आणि व्हिज्युअल्सचा समावेश असू शकतो.
वाचाः iPhone 15 ची वाट पाहणाऱ्यांसाठी धक्कादायक न्यूज, किंमत ऐकून धडकी भरणार
वाचाः ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 14 Plus, पाहा ऑफर्स