किंमतीचं काय?
किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, TCL T6G 4K QLED टीव्हीच्या ४३ इंच व्हेरिएंटची किंमत ३८,९९० रुपये, ५० इंच व्हेरिएंटची किंमत ४६९९० रुपये आणि ५५ इंच व्हेरिएंटची किंमत ५४,९९० रुपये आहे. हे तिन्ही मॉडेल अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
TCL T6G 4K QLED टीव्हीचे फीचर्स
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, TCL T6G 4K QLED TV मध्ये ४३ इंच,५० इंच आणि ५५ इंच डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 3840 × 2160 पिक्सेल आहे. डिस्प्लेमध्ये 300 nits पर्यंत ब्राइटनेस आहे. गेमिंग प्रेमींसाठी, टीव्ही एएमडी फ्रीसिंकसह सुसज्ज आहे जो भारी गेमिंग अनुभव देतो. याशिवाय, ५५ इंचाचे मॉडेल 120Hz गेम एक्सीलरेटरला सपोर्ट करते जे गेमिंग दरम्यान अतिरिक्त स्मूथनेस प्रदान करते. प्रोसेसरबद्दल बोलायचे झालं तर हा ६४ बिट क्वाड कोर प्रोसेसरने हे टीव्ही सुसज्ज आहेत, ज्यामध्ये Mali-G31 x 2 800MHz GPU देण्यात आला आहे. T6G मालिकेत 2GB RAM आणि 16GB स्टोरेज आहे. ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत, हे Google TV वर कार्य करते. टीव्हीचा रिमोट व्हॉइस कमांडला सपोर्ट करतो आणि नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, एचडीएमआय 2.1 पोर्ट, यूएसबी पोर्ट, एव्ही इनपुट आणि इथरनेट पोर्ट आहे. ऑडिओसाठी, 43 आणि 50-इंच मॉडेलमध्ये 30W स्टिरिओ आहे, तर ५५ इंच मॉडेलमध्ये 56W आउटपुट आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा