शाओमी पॅड ६ ची किंमत
शाओमी पॅड ६ च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. याच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २८ हजार ९९९ रुपये आहे. याला ग्रे आणि मिस्ट ब्लू कलर मध्ये खरेदी करू शकता. ICICI बँकेच्या ऑफर नंतर याला अनुक्रमे २३ हजार ९९९ रुपये आणि २५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
या टॅबलेटची विक्री २१ जून पासून सुरू होणार आहे. याला अमेझॉन, मी.कॉमसह अन्य रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकता. शाओमी पॅड ६ कीबोर्ड आणि कव्हर तसेच स्मार्ट पेन ची किंमत अनुक्रमे ४ हजार ९९९ रुपये आणि १४९९ रुपये आणि ५ हजार ९९९ रुपये आहे. या सर्व एक्सेसरीज २१ जून पासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.
शाओमी पॅड ६ चे फीचर्स
यात अँड्रॉयड १३ वर आधारित MIUI 14 दिले आहे. यात ११ इंच 2.8K (1800×2880 पिक्सल) IPS LCD दिले आहे. या टॅबलेट मध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट दिले आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. हा टॅबलेट स्नॅपड्रॅगन 870 SoC सोबत येतो. यात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. Xiaomi Pad 6 मध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
वाचाः ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 14 Plus, पाहा ऑफर्स
या टॅबलेट मध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्ट दिले आहे. यात क्वॉड स्पीकर सेटअप उपलब्ध आहे. यात वाय फाय ६, ब्लूटूथ ५.३ आणि एक यूएसबी टाइप सी पोर्टचा समावेश आहे. यात एक्सेलेरोमीटर, एंबियट लाइट सेंसर, जायरोस्कोप आणि हॉल सेन्सर सारख्या सेन्सरचा समावेश आहे. यात 8840 एमएएचची बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते.
वाचाः Apple Days sale मध्ये स्वस्तात आयफोन खरेदीची संधी, शानदार सूट पाहा