Aadhar Update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची संधी, सोप्या आहेत स्टेप्स

नवी दिल्ली : Update Aadhar Card : जर तुमचं आधार कार्ड १० वर्षांपूर्वीचं आहे आणि त्यात कोणतच अपडेट झालेलं नाही तर आता तुम्हाला कोणतंही अपडेट करण्याची आताच संधी आहे. कारण १४ जून नंतर या प्रोसेससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आधार किंवा आयडेंटी अपडेट करण्याची आता मोफत संधी आहे. पण १४ जून नंतर मात्र याला पैसे मोजावे लागणार आहेत. UIDAI ने केलेल्या घोषणेनुसार १५ मार्च ते १४ जून, २०२३ पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची संधी आहे. यासाठी http://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. कारण १४ जूननंतर अपडेट करण्यासाठी ५० रुपये फी द्यावी लागणार आहे. ई-सेवा केंद्रावरही हे अपडेट करता येणार आहे. तर ऑनलाईन अपडेट करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

या स्टेप्स करा फॉलो
१. सर्वात आधी http://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर भेट द्या
२. मग आधार कार्ड आणि त्याला लिंक मोबाईलनंबरवरील ओटीपीच्या मदतीने लॉगिन करा. त्यानंतर ‘Name/Gender/Date of Birth & Adress Update’ हा पर्याय निवडा.
३. त्यानंतर ‘Update Aadhaar Online’ पर्यायावर क्लिक करा.
४. डेमोग्राफिक ऑप्शन्सच्या यादीत Adress पर्याय निवडा मग ‘Proceed to Update Aadhaar’ पर्यायावर क्लिक वरा.
५. मग तुम्हाला जो देखील अपडेट करायचा आहेत्या डॉक्यूमेंटची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
६. कोणतीही फी न भरता तुमची रिक्वेस्ट अपडेट होई आणि तुम्हाला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) मिळेल, तुमच्या रिक्वेस्टचं स्टेटस बघण्यासाठी तुम्ही हा नंबर वापरु शकता.

वाचा : पॅन-आधार लिंक करण्याची अखेरची तारीख ३० जून, नाही केलंत तर होईल मोठं नुकसान

ऑफलाइन अपडेटसाठी ५० रुपये

आधार ऑफलाइन अपडेट करण्‍यासाठी अर्थात ई सेवा केंद्रातून अपडेटसाठी ५० रुपये फी भरावी लागणार आहे.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

Source link

aadharaadhar cardaadhar card updateaadhar updatefree aadhar card updateआधार कार्डआधार कार्ड अपडेट
Comments (0)
Add Comment