स्टेम डिझाइन सोबत Redmi Buds 4 Active लाँच, बजेट रेंजमध्ये बेस्ट ऑप्शन

Xiaomi ने भारतात आपले नवीन ट्रूली वायरलेस स्टीरियो (TWS) ईयरबड्सला भारतात लाँच केले आहे. Redmi Buds 4 Active ला बजेट सेगमेंट मध्ये लाँच केले आहे. हे आयपी रेटिंग सोबत येते. हे स्वेट आणि स्प्लॅश रेसिस्टेंट सोबत येते. सोबत कंपनीने दावा केला आहे की, हे मोठ्या बॅटरी लाइफ सोबत येते. रेडमी बड्स ४ अॅक्टिवची किंमत, स्पेसिफिकेशन्स, सेल तारीख यासंबंधी सविस्तर जाणून घ्या.

Redmi Buds 4 Active ची किंमत
हे कंपनीचे नवीन TWS ईयरबड्स आहेत. याची किंमत १ हजार ३९९ रुपये आहे. याला सेल सुरू झाल्यानंतर काही दिवसांपर्यंत ११९९ रुपये किंमतीत खरेदी करता येणार आहे. याला ब्लॅक आणि व्हाइट कलर मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. याचा सेल २० जून पासून मी.कॉम, अमेझॉन, मी होम स्टोर्स आणि अन्य रिटेल स्टोर्सवर आयोजित करण्यात येणार आहे.

Redmi Buds 4 Active चे फीचर्स
हे स्टेम डिझान सोबत येते. यात सिलिकॉन ईयर टिप्स उपलब्ध आहेत. यात टच आधारित जेस्चर्स सारखे ऑडियो, कॉल्स, व्हाइस असिस्टेंट आदी कंट्रोलचा समावेश करण्यात आला आहे. यात 12mm डायनेमिक ड्राइवर्स उपलब्ध आहे. सोबत ENC फीचर दिले आहेत. रेडमीच्या नवीन ईयरबड्स लो लेटेंसी गेमिंग मोड सोबत येते.

वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

शाओमीने म्हटले आहे की, हे गुगल फास्ट पेयर फीचर सोबत येते. हे ब्लूटूथ डिव्हाइसने सहज कनेक्ट केले जाऊ शकते. यात ब्लूटूथ ५.३ दिले आहेत. यात IPX4 रेटिंग दिली आहे. स्प्लॅश आणि स्वेट रेसिस्टेंट सोबत येते. हे ईयरबड 34mAh च्या बॅटरी सोबत येते. जो ५ तासाची बॅटरी लाइफ ऑफर करते. चार्जिंग केस 440mAh च्या बॅटरी सोबत येते. हे ९० मिनिटात फुल चार्ज होते.

वाचाः ४० रुपये कमी किंमतीतील जिओचा हा रिचार्ज ठरला हिट, १२ जीबी एक्स्ट्रा डेटा आणि फ्री कॉलिंग

Source link

Redmi BudsRedmi Buds 4Redmi Buds 4 Activeरेडमी बड्सरेडमी बड्स किंमत
Comments (0)
Add Comment