Nothing Phone (2) चे हार्डवेयर
कंपनीचा दावा आहे की, हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ झेन २ प्रोसेसर सोबत येईल. हे Nothing Phone (1) मध्ये दिलेल्या 778G+ पेक्षा जबरदस्त आहे. नवीन फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम दिली जाणार आहे. तर १२८ जीबी स्टोरेज दिले जाणार आहे.
नथिंग फोन (2) चे सॉफ्टवेयर
या फोनमध्ये Nothing OS 2.0 दिले जाणार आहे. सोबत यात यूजर एक्सपीरियन्स जबरदस्त असेल. यात ३ वर्षाचे अँड्रॉयड अपडेट आणि ४ वर्षाचे सिक्योरिटी अपडेट सुद्धा दिले जाणार आहे. हा फोन स्टॉक अँड्रॉयड सोबत येईल.
वाचाः ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 14 Plus, पाहा ऑफर्स
फोनची डिझाइन
Nothing Phone (1) चा यूआय खूपच चांगला होता. याची डिझाइन सुद्धा चांगली बनवली होती. आता Phone (2) चा लूक सुद्धा याच प्रमाणे असेल. यात काही बदलासोबत Glyph पॅटर्न आणि कस्टमायझेशन उपलब्ध करण्यात येईल.
वाचाः आता बहाणा नको! अर्ध्या किंमतीत मिळतेय वॉशिंग मशीन, १४ जूनपर्यंत ऑफर
Nothing Phone (2) ची संभावित किंमत
या फोनला प्रीमियम किंमतीसोबत टॅक केले जाऊ शकते. नथिंग फोन २ ची किंमत ४० हजार ते ५० हजार या दरम्यान असू शकते. परंतु, ही संभावित किंमत आहे. कंपनीने याच्या किंमतीसंबंधी अजूनपर्यंत कोणतीही माहिती दिली नाही.
वाचाः डिजिटल पेमेंट : भारतानं चीनला दाखवून दिलं, जगातील नंबर वन देश, पाहा टॉप ५ लिस्ट