​Photo Editing Apps : आता सोप्या पद्धतीनं करा फोटो एडिटिंग, ‘हे’ आहेत टॉप ५ ॲप्स

Picsart

मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात फोटोला एडिट करण्यासह अनेक फोटोंचं कोलाज बनवण्यासाठी हे Picsart AI Photo Editor अॅप वापरतात. हे प्ले स्टोअरवरून कोट्यवधीवेळा डाउनलोड केले गेले आहे. फोटो एडिटिंगसाठी या अॅपमध्ये बऱ्याच खास गोष्टी आहेत. यात
तुम्ही फोटोसह फोटो इफेक्ट्स आणि फिल्टर्सचा वापर करून पाहू शकता. तसेच, तुम्ही बॅकग्राउंडही बदलू शकता.

वाचा : Amazon India झालं १० वर्षांचं, लाँचिंगवेळी सर्वात आधी विकल्या गेल्या होत्या ‘या’ १० गोष्टी​

Snapseed

खासकरुन गुगलचंच हे एक उत्कृष्ट फोटो एडिटिंग ॲपआहे. हे ॲपव्यावसायिक वापरकर्त्यांसाठी अधिक उपयुक्त आहे. या ॲपला Google Play Store वरून ते १०० दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. या ॲपच्या मोबाईलचा मोबाईल एडिटिंग इंटरफेस अतिशय सोपा आहे, ज्यामुळे तो फोटोग्राफर आणि एडिटिंग करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

​​वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

PhotoShop

जेव्हा फोटो एडिटिंगचाविषय निघतो तेव्हा Adobe फोटोशूट प्रामुख्याने आठवतं. मोठ्या लेव्हलला एडिटिंग फोटोशॉपने होत असून याचं मोबाईल व्हर्जनही आहे. वापरायला सोपं पण सोबतच दमदार फीचर्ससह हे अॅप येत असून गुगल प्ले स्टोअरवरून ते लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

​P​ixlr

Pixlr हे देखील एक भारी आणि लोकप्रिय फोटो ए़डिटिंग अॅप आहे. हे गुगल प्ले स्टोअरवरून ५० दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहे. हे विनामूल्य आणि सशुल्क अशा दोन्ही व्हर्जनमध्ये येते. Pixlr ची विनामूल्य आवृत्ती फिल्टर आणि काही मूलभूत फीचर्सचा वापर करु देते. तर पेड व्हर्जनमध्ये आणखी भारी फीचर्स दिले गेले आहेत.

वाचा : Jio recharge : दिवसभर ऑनलाईन असता? आणि डेटा पुरत नाही, जिओचा खास डेटा बुस्टर पॅक, किंमत फक्त ६१ रुपये

Adobe Photoshop Lightroom

एकीकडे Adobe चं फोटोशॉप अॅर असताना Adobe Photoshop Lightroom देखील एक भारी आणि पावरफुल फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग अॅप आहे. Google Play Store वरून ते १०० दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. यामध्ये तुम्ही इमेज एडिटर आणि फोटो फिल्टर्स देखील वापरू शकता.

​वाचा : घरबसल्या आधार कार्ड ‘फ्री’ मध्ये करा अपडेट, १५ जून २०२३ पर्यंत संधी, त्यानंतर मोजावे लागणार पैसे​

Source link

appsPhoto editingPhoto editorPhoto editor appsPhotoshopफोटो एडिटर ॲप्सफोटो एडिटिंग ॲप्स
Comments (0)
Add Comment