राज्यात जिनॉम सिक्वन्सिंगद्वारे डेल्टाचे ६६ रुग्ण असल्याची माहिती समोर आली होती. त्यात डेल्टा प्लसचे तीन विविध प्रकार आहेत. त्यांना Ay.1, Ay.2 आणि Ay.3 अशी नावे देण्यात आली आहे. तज्ज्ञांनी डेल्टा प्लसच्या आणखी १३ उपवंशांचा शोध लावला आहे. Ay.1, Ay.2, Ay.3 पासून त्यांची सुरुवात होते. डेल्टा विषाणूचे म्युटेशन झाल्यानं डेल्टा प्लसची निर्मिती झाली आहे. डेल्टाच्या स्पाईक प्रोटिनमध्ये K417N नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळं डेल्टा प्लस विषाणू तयार झाला आहे.
वाचाः कोल्हापूरनं चिंता वाढवली; डेल्टा प्लसचे ६ रुग्ण आढळले
डेल्टा प्लसच्या १३ प्रकारांमधील ३ प्रकार महाराष्ट्रात सापडले आहेत. सुरुवातीला डेल्डा प्लसवर मोनोक्लोमल अँटीबॉडी कॉकटेल ट्रीटमेंटचा प्रभाव फारसा उपयोग होत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं डेल्टा प्लसचा संक्रमणाचा दर अधिक असल्याचं लक्षात येतं.
मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला मृत्यू
मुंबईत डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तसंच, या महिलेच्या कुटुंबातील ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील दोन जणांमध्ये डेल्टा विषाणू आढळला आहे.
वाचाः मुंबईकरांना आणखी दिलासा; उद्याने, चौपाट्यांबाबत घेतला मोठा निर्णय