या बदलांमध्ये असा एक ब्रँड आहे, जो ग्राहक तंत्रज्ञान आणि घरगुती उपकरणांचा प्रणेता मानला जातो. विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे, सॅमसंगमधील इंजिनिअर्सना रेफ्रिजरेटर्सचीही गरज भासू लागली. या शोधाचे उत्तम उदाहरण म्हणजे सॅमसंगचा नवीन श्रेणीमधील Samsung Family Hub Side By Side Refrigerator होय. आधुनिक कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन आणि आधुनिक तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा किती चांगल्या प्रकारे एक भाग बनले आहे हे पाहून Samsung Family Hub Side By Side Refrigerator आपण आताच्या आता घरी आणू शकतो, अशा उपकरणांपैकी एक आहे.
ते दिवस गेले जेव्हा रेफ्रिजरेटर फक्त स्वयंपाकघरापर्यंतच मर्यादित होते. Samsung Family Hub सारखे आधुनिक रेफ्रिजरेटर तुमच्या राहण्याच्या जागेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून डिझाईन करण्यात आले आहे. सॅमसंग त्याच्या स्वतःच्या श्रेणीमध्येच काही वेगळे फायदे यातून देत आहे. सुरूवात म्हणून , रेफ्रिजरेटरमध्ये Bixby आणि Alexa सह व्हॉइस कंट्रोल देण्यात आला असून हे तुमच्या घरातील इतर उपकरणांशी कनेक्ट आणि संवाद साधण्याची क्षमता यासारख्या वैशिष्ट्यांनी युक्त असा आहे. फॅमिली हबचा विशिष्ट घटक म्हणजे, 25 वॉट स्पीकर असलेली मोठी LCD स्क्रीन, जे तुमचे लक्ष वेधून घेते आणि हेच याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
तुमच्या रेफ्रिजरेटरवर मोठी स्क्रीन असल्याने आता संपूर्ण जग तुमच्यासमोर खुले झाले आहे, कारण घरगुती उपकरणे आता तुमच्या दैनंदिन बोलण्याचा आणि दैनंदिन कामाचा एक भाग होऊ शकतात. Samsung Family Hub वरील डिस्प्ले तुमचे विविध प्रकारे मनोरंजन करू शकतो. कारण तो तुमच्या Galaxy स्मार्टफोनवरून व्हिडिओ किंवा आवडते संगीतही घेऊ शकतो. शिवाय, रेफ्रिजरेटर इंटरनेटशी कनेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीचे व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी Alexa आणि Bixby सारखे व्हॉइस असिस्टंटदेखील वापरू शकता, ज्याबद्दल खरंच तुम्ही रेफ्रिजरेटरला धन्यवाद म्हणायला हवेत.
मोठ्या कुटुंबांसाठी, जेवण बनवणे खरंच खूप थकवणारे काम असते. त्यांचे आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी सॅमसंगने यामध्ये Revolutionary View Inside फिचर जोडले आहे. हे फिचर तुम्हाला रेफ्रिजरेटरमध्ये असलेल्या कॅमेऱ्यामुळे तुमच्या फ्रिजमधून कुठूनही, कोणत्याही वेळी SmartThings App च्या आधाराने काहीही निवडण्याची परवानगी देते. आणि हे फक्त तेव्हाच नाही जेव्हा लोक त्यांच्या घरापासून दूर असतात, तर View Inside चे हे फिचर तुम्हाला कधीही दरवाजा न उघडता तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये काय आहे हे पाहण्याची परवानगी देते. रेफ्रिजरेटरच्या आत काय आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला फक्त स्क्रीनवर डबल-टॅप करायचे आहे किंवा स्क्रीन खाली स्क्रोल करायची आहे. तुम्ही Bixby ला तुमच्या फ्रिजच्या आत काय आहे ते काढून द्यायला सांगू शकता.
आपल्या सर्वांच्या फ्रिजमध्ये काही कच्ची फळे आणि भाज्या असतात ज्या कोणत्या तरी रेसिपीमध्ये वापरले जाण्याची नक्कीच वाट पाहात असतात. पण, त्या कमी वापरलेल्या भाज्यांचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा हे जर कुणीतरी सुचवलं तर. येथे देखील, Samsung Family Hub Refrigerator तुमची मदत करण्यासाठी हजर आहे. SmartThings Cooking सह, तुम्ही तुमच्या फ्रिजमधील साहित्य आणि तुमच्या आवडीनुसार आणि ठरवलेली रेसिपी करून घेऊ शकता.
पण मूलभूत गोष्टींचे काय? जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळवून देण्यासाठी Samsung ने हे अधिक सोपे आणि स्मार्ट काम केले आहे. वाढत्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फॅमिली हबची क्षमता 615 लीटर आहे. तसंच हा एक कन्व्हर्टिबल रेफ्रिजरेटर आहे, जो तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टोरेज वापरण्यास मदत करतो. तुम्ही पाच कन्व्हर्टिबल स्वरूपात बदल करू शकता. उदाहरणार्थ, अन्न अधिक ताजे राहावे यासाठी तुम्ही तुमच्या फ्रीजरचे फ्रीजमध्ये रूपांतर करू शकता, ऊर्जा वाचवण्यासाठी फ्रीज किंवा फ्रीजर बंद करू शकता किंवा फ्रीजरचा वापर फ्रीज म्हणूनदेखील करू शकता.
फॅमिली हबच्या एक पॅनेलवर स्क्रीन डिस्प्ले आहे, तर दुसऱ्या पॅनेलमध्ये बर्फ आणि पाणी यासाठी डिस्पेंसर आहे. त्यात नॉन-प्लंबिंग बर्फ आणि पाण्याच्या डिस्पेंसरसाठी एक मोठी, BPA-मुक्त पाण्याची टाकी आहे. अशा प्रकारे, हा रेफ्रिजरेटर घरात कोणत्याही ठिकाणी तुम्ही ठेऊ शकता.
अशा बऱ्याच वैशिष्ट्यांसह, सॅमसंग रेफ्रिजरेटर्स आपल्या कुटुंबासाठी अधिक आकर्षित बनवित आहे. Family Hub Refrigerator हे तुमच्या घरातील मुख्य आकर्षणबिंदू बनावा असा घडविण्यात आला आहे! मध्यम आणि आधुनिकपणाची सांगड घातलेले डिझाईन कोणत्याही घरासाठी उपयुक्त ठरते. Family Hub Convertible Side By Side Refrigerator ची किंमत रु.153000 पासून सुरू होऊन 174000 पर्यंत जाते. Samsung Refrigerator बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Disclaimer: The article has been produced on behalf of Samsung by the Times Internet’s Spotlight team.