एसी कमी तापमानात वापरु नका
तुम्ही सर्वात कमी तापमानात म्हणजे १६अंशांवर एसी चालवू शकता. पण एसी २२ ते २४ डिग्री दरम्यानच चालला पाहिजे. यामुळे वीच बचत होऊ शकते. कारण तापमानात प्रत्येक एक अंश वाढ झाल्यास ६ टक्के अधिक विजेची बचत होते. अशा परिस्थितीत १६ अंशांऐवजी २४ वर एसी चालवल्यास सुमारे ५६ टक्के विजेची बचत होईल.
वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान
वेळेवर सर्व्हिसिंग करा
एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणं फारचं गरजेचं असते. असं न केल्यास एसीची कूलिंग कमी होऊ शकते. यामुळे आपण कमी तापमानावर एसी चालवू आणि त्यामुळे एसी चालवल्यास वीज बिल जास्त येऊ शकते. एसी फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करावेत. तुमच्या एसी मॉडेलला किती वेळा सर्व्हिसिंगची आवश्यकता असते? ही माहिती देखील ठेवावी, त्यारितीने एसी वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करावा.
वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो
एसी सुरु ठेवताना दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्या
एसी चालवताना खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवावेत. जेव्हा खिडक्या आणि दरवाजे बंद असतात तेव्हा खोली थंड ठेवण्यासाठी एअर कंडिशनरला कमी काम करावे लागते. अशा प्रकारे विजेचा खर्च देखील कमी होतो.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
टाइमर सेट करा
उन्हाळ्यात एसी 24/7 चालू ठेवू नये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसी वापरला जातो आणि विजेचं बिलही जास्त येतं. त्यामुळे एसी चालवताना टायमर लावावा. रात्रीच्या वेळीही एसी वापरताना टायमरचा वापर करावा. त्यामुळे विजेचा खर्च कमी होतो.
वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच
पंखा सुरु ठेवून एसी चालवा
खोली अधिक जलदगतीने थंड होण्यासाठी पंख्यासोबत एसीचा वापर करावा. यामुळे खोली लवकर थंड होते. अशावेळी एसीला कमी काम करावे लागेल. ज्यामुळे एसीचे वीज बिलही कमी होईल.
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स