माणुसकीला काळीमा; मुलाच्या हव्यासापोटी परदेशात नेऊन केला आठ वेळा गर्भपात

हायलाइट्स:

  • वंशाचा दिवा हवा म्हणून छळ
  • निवृत्त न्यायाधीशाच्या मुलीची छळवणूक
  • सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

मुंबईः वंशाचा दिवा मिळावा म्हणून पत्नीला परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. विशेष म्हणजे दादरच्या उच्चभ्रू वस्तीत उच्चशिक्षित व श्रीमंत कुटुंबात हा प्रकार उघडकीस आला आहे.

निवृत्त न्यायाधीश असलेल्या वडिलांनी आपल्या मुलीचा विवाह २००७ मध्ये एका उच्चशिक्षित व प्रतिष्ठित कुटुंबात करुन दिला होता. पिडीतीचे पती व सासू, सासरे वकील आहेत. तर नणंद डॉक्टर आहे. लग्नानंतर काही वर्षांनी माझा वंश व मालमत्ता जपण्यासाठी मुलगा हवाय, म्हणत पिडीत महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर, मुलाच्या हव्यासापोटी परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपातही करण्यात आला.

वाचाःमोठी बातमी! बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना करोना

२००मध्ये पीडित महिलेनं एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर पुन्हा २००१मध्ये ती पुन्हा गर्भवती राहिल्याने पतीने तिला डॉक्टरांकडे नेले आणि मूल नको असल्याचं सांगत गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेच्या अत्याचारात वाढ झाली. मुंबईत मुलगा होण्यासाठी उपचारही सुरू केले. तसंच, पतीने प्री इम्प्लांटेशन जेनेटिक जायग्नोसिस या टेस्टसाठी बँकॉकला नेले. तेथे ८ वेळा गर्भ धारणेच्या आधि एम्ब्रियोच्या लिंगाची तपासणी करुन उपचार व शस्त्रक्रिया करत होते. भारतात बंद असलेल्या उपचार करण्यासाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन तब्बल आठवेळा गर्भपात करण्यात आलाय. फिर्यादीला दीड हजाराहून अधिक हार्मोनल आणि स्टिरॉइडचे इंजेक्शन देण्यात आली होती.

वाचाः मुंबईकरांना आणखी दिलासा; उद्याने, चौपाट्यांबाबत घेतला मोठा निर्णय

मुलगा होण्याच्या उपचारासाठी सासू आणि पतीने संयुक्त खाते उघडून खात्यातील ३४ लाखही त्यांच्या खात्यात वळते केले होते. सासरच्या लोकांचे अत्याचार सहन न झाल्याने पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

वाचाः कोल्हापूरनं चिंता वाढवली; डेल्टा प्लसचे ६ रुग्ण आढळले

Source link

Crime in Mumbaifamily torture daughter in lawmumbai newsमुंबई न्यूजसुनेचा छळ
Comments (0)
Add Comment