योग्य कूलिंग पॅडची निवड
नेहमी आपण कूलर खरेदी करताना काही गोष्टीची पडताळणी करीत नाही. त्यात कोणत्या कूलिंग पॅडचा वापर केला आहे, त्यासंबंधी लक्ष देत नाही. परंतु, कूलर खरेदी करताना घरातील कूलिंग पॅडच्या जागी हनीकॉम्बचा वापर करायला हवा. खरं म्हणजे कूलिंग पॅडच्या तुलनेत हनीकॉम्ब जास्त कूलिंग देते. हनीकॉम्बला खास करून सेलूलोस मटेरियलने बनवले आहे. यात पाणी सुखण्याची क्षमता होते. यामुळे बाहेरची गरम हवा लवकर थंड करते.
हनीकॉम्बचे फायदे
हनीकॉम्बला २ ते ३ वर्षापर्यंत आरामात वापरता येऊ शकते. याचे मेंटिनेंस सुद्धा कमी होते. तर गवताच्या पॅडमधून धूळ जमा होण्याची भीती असते. त्यामुळे त्याला दरवर्षी बदलावे लागते. हनीकॉमला एअरवेज सारखी डिझाइन मिळते. यामुळे हवा थंड मिळते. तर गवत असलेल्या पॅडमध्ये होल्स असतात. या ठिकाणाहून हवा आत येते. यामुळे गरम हवेचे फ्लो होते.
वाचाः ४० रुपये कमी किंमतीतील जिओचा हा रिचार्ज ठरला हिट, १२ जीबी एक्स्ट्रा डेटा आणि फ्री कॉलिंग
गवताचे फायदे
गवताचे सुद्धा फायदे असतात. परंतु, पैसे वाचवण्यासाठी अनेक वेळा कूलर मध्ये कमी गवताचा वापर केला जातो. परंतु, जर तुम्ही वेगळे गवत घेऊन त्याचा वापर करीत असाल तर गवताच्या पॅडमध्ये होल्स खूप छोटे असते. एअर फ्लो असल्याने ते थंड होते. जास्त गवताचा वापर केल्यास हनीकॉम्ब हून जास्त कूलिंग करू शकते.
वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स
किंमत
मार्केटमध्ये हनीकॉम्ब ७०० रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. याची जास्तीत जास्त किंमत १४०० रुपये आहे. तर तुम्हाला ८० रुपये ते १०० रुपये किंमतीत मिळू शकतो. परंतु, तुमच्या घराच्या हिशोबानुसार, तुम्ही याचा वापर करू शकता.
वाचाः पैसे न देता ऑनलाइन बुक करा ओयो, जाणून घ्या डिटेल्स