निर्मात्यांसोबतच प्रेक्षकांच्याही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट असे तीन विक्रम मोडू शकतो ज्यामुळे हा चित्रपट यशस्वी होईल असे बोलले जात आहे. तसेच हा चित्रपट शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमाच्या कमाईला टक्कर देईल हे नक्की. चित्रपटाचा विषय असा आहे की लोक आपल्या संपूर्ण कुटुंबासह चित्रपट पाहण्यास जाऊ शकतात.
चित्रपटाची आगाऊ बुकिंग
ओम राऊतच्या आदिपुरुष या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग रविवारी सुरू झाले आहे. तेव्हापासून पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या बुकिंगचा विक्रम मोडल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या बातम्यांचे खंडन केले आणि म्हटले की या चित्रपटाची तिकिटे चांगली विकली गेली असली तरी ती शाहरुख खानच्या पठाणची अजून तरी बरोबरी करू शकलेली नाहीत.
पहिल्या दिवशी इतके कलेक्शन करू शकतो सिनेमा
सिनेव्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांच्या मते, आदिपुरुष सर्व भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर सुमारे ५० कोटींची कमाई करू शकतो. ‘हा एक खरा संपूर्ण भारतीय चित्रपट आहे जिथे दिग्दर्शक आणि निर्माते उत्तरेकडील आहेत, तर मुख्य भूमिकेत दक्षिणेकडील एका मोठ्या स्टारला कास्ट केले आहे. प्रभासची फॅन फॉलोइंग पाहता, मला अंदाज आहे की या चित्रपटाला हिंदी भाषेत सुमारे १५- १८ कोटींची ओपनिंग मिळेल. हा चित्रपट सर्व भाषांमधील आतापर्यंतच्या टॉप टेन ओपनर्समध्ये असेल आणि निश्चितपणे सर्व भाषांमध्ये ५० कोटींपेक्षा जास्त आकडा गाठू शकतो.’
प्री-बुकिंगचा मोठा फायदा
PVR ने यापूर्वीच १लाखाहून अधिक तिकिटे विकली आहेत, त्यापैकी २५ टक्के तिकिटे दक्षिणेकडील राज्यांमध्ये विकली गेली आहेत. हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या ५ भाषांमध्ये रिलीज होणाऱ्या आदिपुरुषच्या प्री-बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
रिलीजपूर्वी इतके कलेक्शन केले
आदिपुरुषने त्याच्या वितरण, ओटीटी आणि सॅटेलाइट हक्कांमधून उत्पादन खर्चाचा काही भाग वसूल केला आहे. व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार, निर्मात्यांनी आधीच वितरण अधिकारांमधून २७० कोटी रुपये कमावले आहेत. एका रिपोर्टनुसार, चित्रपटाचे ओटीटी आणि सॅटेलाइट राइट्स २१० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. आता चित्रपट, तिकीट विक्रीतून किती कमाई करतो हे पाहावे लागेल.