‘त्या’ घोषणेमुळं पंकजा मुंडे यांना राग अनावर; कार्यकर्त्यांना जाहीरपणे म्हणाल्या…

हायलाइट्स:

  • पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात
  • कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळं पंकजा मुंडे यांना राग अनावर
  • माझ्या उंचीप्रमाणे वागा, नाहीतर भेटायला येऊ नका – पंकजा मुंडे

बीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी देशभरात जन आशीर्वाद यात्रा सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांचाही यात समावेश आहे. नवनिर्वाचित मंत्री भागवत कराड यांनी यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्या उपस्थितीतच कराड यांची यात्रा सुरू झाली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या एका घोषणेमुळं पंकजा मुंडे यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना जाहीररित्या झापले.

वाचा:LIVE जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीलाच भारती पवार यांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मागील महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची वर्णी लावली. राजकीय कुरघोडीतून पुन्हा एकदा मुंडे कुटुंबीयांवर अन्याय करण्यात आल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची घोषणाही केली होती. पण तेव्हा पंकजांनी त्यांना थांबवले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद अद्यापही कायम आहे. जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी आज कराड यांनी पंकजा यांची भेट घेतली. तेव्हा याच नाराजीची प्रचिती आली. पंकजा मुंडे यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. ‘मुंडे साहेब अमर रहे… पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है…’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.

वाचा: ‘राजकारणात सपशेल अपयशी ठरलेले राज ठाकरे आता स्वत:च्या फायद्यासाठी…’

कराड यांच्या भेटीनंतर त्यांच्या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठीही पंकजा उपस्थित होत्या. मात्र, तेव्हाही कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरूच होत्या. त्यातील ‘अंगार… भंगार’ या घोषणेमुळं पंकजा मुंडे संतापल्या. अशा घोषणा देणाऱ्यांना त्या मूर्ख म्हणाल्या. ‘मी तुम्हाला असं वागायला शिकवलंय का? मूर्ख कुठले? मुंडे साहेब अमर रहे… या घोषणा मी रोखू शकत नाही. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. पण अंगार, भंगार हे काय लावलंय? हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का?,’ असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. ‘असं वागणं मला शोभत नाही. जेवढ्या मोठ्या उंचीची मी आहे, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची. नाहीतर मला भेटायला येऊ नका,’ असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.

वाचा:मुंबईतील करोना आटोक्यात आणणाऱ्या सुरेश काकाणी यांनाच करोनाची बाधा

Source link

Beed News in MarathiBhagwat Karad Met Pankaja MundeJan Ashirwad YatraPankaja MundePankaja Munde in Parlipankaja munde latest newsPankaja Munde Warns Supportersपंकजा मुंडेपंकजा मुंडेंनी समर्थकांना झापले
Comments (0)
Add Comment