वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
iQOO 9 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 3200×1440 पिक्सेल रेझ्यूलेशनसोबत ६.७८ इंचाचा 2K Amoled डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याचा टच सँपलिंग रेट 300Hz इतका आहे. तसंच याची पीक ब्राईटनेस लेव्हल ही 1500 nits इतकी आहे. रॅम आणि स्टोरेज वर सांगितल्याप्रमाणे १२ जीबी आणि २५६ जीबी आहे. याच्या प्रोसेसरचा विचार केला तर Snapdragon 8 Gen 1 हा प्रोसेसर दिला गेला आहे. कॅमेऱ्याचं म्हणाल तर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून ५० मेगापिक्सल वाइड अँगल आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. याशिवाय बॅटरी ही 4500mAh इतरी असून १२० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फास्ट चार्जिंगमुळे फोन ८ मिनिटांत ५० टक्के चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. हा फोन अँड्रॉईड १२ वरील Funtouch os 12 वर काम करतो.
वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच