तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
पुणे :- :- अदर पुनावाला यांच्या सेवा भावी संस्थेची कार्यकर्ता व सभासद असल्याचे सांगुन पुनावाला यांच्या संस्थेमार्फत 5 लाख रूपयाचे कर्ज बिनव्याजी देण्याचे आमिष दाखवुन एका महिलेने तिघांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेविरूध्द मार्केटयार्ड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिला अटक करण्यात आली आहे.
सकीना तायर पुनावाला (32, रा. वेलकम हॉल, फ्लॅट नं. 4, कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंकुश दंडाप्पा बजलोर (40, रा. आंबेडकर नगर) यांनी मार्केयार्ड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना सकीना पुनावाला ही त्यांच्या घरी गेली. तिने आपण अदर पुनावाला यांच्या सेवा भावी संस्थेची कार्यकर्ता आणि सभासद असल्याचे त्यांना सांगितले. पुनावाला यांच्या सेवाभावी संस्थेकडून 5 लाख रूपयायाचे कर्ज बिनव्याजी देण्याचे आमिष तिने फिर्यादीला दाखविले.
सकीना पुनावाला हिने फिर्यादीकडून नगछी 17 हजार रूपये, इरफान शेख यांच्याकडून 25 हजार रूपये आणि एका महिलेकडुन 17 हजार रूपये रोख स्वरूपात घेतले. सकीना तिघांना बँक ऑफ बडोदाचा बनावट चेक देवुन एकुण 59 हजार रूपयाची फसवणूक केली. दरम्यान, फिर्यादीने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सकीना पुनावाला हिला मंगळवारी दुपारी अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर करण्यास नेण्यात यांनी दिली आहे.