२०० मेगापिक्सल कॅमेरा, दमदार फीचर्स, Realme 11 Pro 5G + चा सेल आजपासून

नवी दिल्ली : Realme 11 Pro 5G Plus : एकापेक्षा एक दमदार स्मार्टफोन तयार करणारी कंपनी रिअलमीने आपला पहिला वाहिला २०० मेगापिक्सल कॅमेरा असणारे फोन Realme 11 Pro 5G plus भारतात लाँच केला असून आजपासून या सीरिजमधील फोनच्या ओपन सेलला होणार सुरुवात झाली आहे. हा फोन रिअलमीची अधिकृत साईट, फ्लिपकार्टसह ऑफलाईन देखील विकत घेता येणार आहे. या फोनची बुकिंग ८ जूनपासून सुरू झाली होती पण आजपासून याचा ओपन सेल देखील सुरू होत आहे.

फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

तर हा Realme 11 Pro 5G Plus भारतात एकूण दोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 8GB RAM + 256GB असणाऱ्या वेरियंटची किंमत २७,९९९ रुपये आहे. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये येणाऱ्या वेरियंटची किंमत २९,९९९ रुपये इतकी ठेवली गेली आहे. हा फोन अॅस्ट्रल ब्लॅक, सनराइज बेज आणि ओएसिस ग्रीन शेड्स अशा कलर्समध्ये येत आहे.

तर या पहिल्यावहिल्या सेलसाठी 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसाछीच्या वेरियंटवर ICICI, HDFC आणि SBI या बँकच्या कार्डने पेमेंट केल्यास २००० रुपये इतकी सूट मिळणार आहे. तसंच जुन्या डिव्हाईसच्या एक्सचेंजवरही २००० रुपयांचं अधिक डिस्काउंट आहे. तसंच 12GB RAM + 256GB स्टोरेज पर्यायासाठीही ५०० रुपयेचं एक्सचेंज डिस्काउंट आहे. दोन्ही मॉडेल्स नो कॉस्ट EMI वर विकत घेतले जाऊ शकतात.

फोनचे इतर फिचर्स
या फोनचा डिस्प्ले ६.७ इंचाचा फुल-एचडी+ (1080×2412 पिक्सेल) कर्व्ह डिस्प्ले आहे. 120Hz रिफ्रेश रेटफोनमध्ये आहे. हा फोन Octa-core 6nm MediaTek Dimensity 7050 SoC सह सुसज्ज असेल. फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा दिला जाईल. ज्याचा पहिला सेन्सर २०० मेगापिक्सल Samsung HP 3 सेंसर असणारा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

वाचा : LG चा १.५ टन स्प्लिट एसीवर दमदार ऑफर, अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी, फ्लिपकार्टवर भन्नाट ऑफर

Source link

5g smartphonesrealme 11 pro plusrealme 11 pro plus specsrealme 11 pro priceteam phonesरिअलमी ११ प्रो फोनरिअलमी ५जी फोन
Comments (0)
Add Comment