UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

UPI पेमेंट लिमिट

UPI पेमेंट फेल होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे UPI पेमेंट लिमिट पूर्ण होणे हे आहे. हे दोन्ही बाजूंनी होऊ शकते. म्हणजेच जर तुमची पेमेंट मर्यादा देखील पूर्ण झाली असेल तर पेमेंट थांबवले जाऊ शकते आणि जर पैसे देणाऱ्याची मर्यादा देखील पूर्ण झाली असेल तरी पेमेंट अडकले जाऊ शकते.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

बँक सर्व्हर

UPI पेमेंट फेल होण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे बँक सर्व्हर इश्यू. कोणत्याही बँकेचा सर्व्हर कधीही निकामी होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी, तुमच्या UPI आयडीशी एकापेक्षा जास्त बँक खाती लिंक करून ठेवत जा. पेमेंट करताना काही अडचण आल्यास, तुम्ही बँक खाते बदलून लगेच पेमेंट करू शकता.

​वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

UPI पिन टाकताना काळजी घ्या

आजकाल प्रत्येकाकडे खूप पासवर्ड असतात. म्हणजे एका व्यक्तीची विविध बँक खाती, सोशल मीडिया अकाउंट्स, ऑफिस मेल, पर्सनल मेल या सर्वांमुळे पासवर्ड्स देखील खूप होतात. त्यामुळे कधीकधी नेमका पासवर्ड लक्षात ठेवणं अवघड होतं. अशावेळी UPI पेमेंट करतानाही अनेक वेळा आपण चुकीचा पिन टाकतो ज्यामुळे पेमेंट फेल होतं. त्यामुळे ​UPI पिन टाकताना काळजी घेणं गरजेचं आहे.

​वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

वापरा UPI लाइट

UPI पेमेंट अयशस्वी होण्यामागे बँक सर्व्हर आणि नेटवर्क हे एक प्रमुख कारण आहे. NPCI ने गेल्या वर्षी UPI Lite लाँच केले. यासह, तुम्ही इन्सन्ट २०० रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता. एका दिवसात तुम्ही UPI Lite अॅपद्वारे एकूण ४,००० रुपये पेमेंट करू शकता. UPI लाईटची खास गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला पिनची गरज नाही आणि बँकेच्या सर्व्हरमध्ये कोणतीही समस्या असल्यासही पेमेंट होईल. तुम्ही ते Google Pay आणि PhonePe अॅपद्वारे देखील वापरू शकता.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

पेमेंट करताना घाई करु नका

भारतात UPI आधारित अॅप्समध्ये PayTM, PhonePe, GPay खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या मदतीने, वापरकर्ते UPI ID किंवा QR कोड स्कॅन करून पैशांचा व्यवहार करत असतात. पण या व्यवहारांत कधी-कधी वापरकर्ते घाईघाईने चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकतात. अनेकदा अशावेळी आपले पैसे चूकीच्या अकाउंटला जातात ज्यामुळे आपले नुकसान होऊ शकते. त्यामुळे युपीआय पेमेंट करताना घाई करु नये तसंच चूकून चुकीच्या पेमेंटवर पैसे गेल्यास काय कराल हे तुम्ही आपल्या खालील बातमीत वाचू शकता…

वाचा – चूकीच्या UPI ID वर केलं पेमेंट, घाबरु नका, ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा संपूर्ण रिफंड

Source link

Digital issueUPI IssueUPI PaymentUPI Payment FailWrong UPI Paymentयुपीआययुपीआय पेमेंट
Comments (0)
Add Comment