Mobile Photography : सुट्टीमध्ये फिरायला गेल्यावर फोनमध्येच भारी फोटो कसे काढाल? ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

​स्मार्टफोनचा कॅमेरा कसा आहे ते आधी समजून घ्या

स्मार्टफोन वापरून चांगले फोटो कॅप्चर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा कसा आहे म्हणजेच त्याची क्षमता किती आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. कारण फोनचं कॅमेरा सेटअप जसं असेल त्यानुसारच फोटो येणार आहेत. पण आम्ही सांगणाऱ्या टिप्समुळे तुम्ही तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याचा पुरेपुर वापर करुन फोटो क्लिक करु शकता. आजकाल बहुतेक आधुनिक फोन अनेक लेन्स सेटअपसह येतात जे वापरकर्त्यांना अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, टेलीफोटो लेन्स, डेडिकेटेड पोर्ट्रेट लेन्स, मॅक्रो लेन्स हे सर्व ऑफर करतात. या सर्वाच्या मदतीने तर फोटोज आणखीच भारी येतात.

​वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

​फोटो काढताना फ्रेमवर खास लक्ष द्या

तुम्ही कोणत्याही वस्तूचा किंवा व्यक्तीचा फोटो घेत असाल तर तो पूर्णपणे फ्रेममध्ये योग्यरित्या असेल हे लक्षात ठेवा. म्हणजेच, ऑब्जेक्ट फ्रेममध्ये चांगली आली पाहिजे आणि अंतरही अधिक नसावं. तसंच कॅमेऱ्याची उंची योग्यरित्या सेटकरुन परफेक्ट फ्रेममध्ये फोटो काढावा.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

​दोन्ही हात वापरा

चांगला फोटो काढण्यासाठी नेहमी दोन हात वापरा जेणेकरून तुमची फोनवरील पकड चांगली होईल आणि तुम्ही ऑब्जेक्ट आरामात कॅप्चर करू शकता. फोनवरील पकड चांगली असल्याने फोटो घेताना फोन हालणार नाही, ज्यामुळे फोटोही ब्लर किंवा चूकीच्या अँगल, फ्रेममध्ये येणार नाही. त्यामुळे दोन्ही हातांचा वापर करुन फोटो काढणं, ही एक भारी ट्रिक आहे.

वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

​तुमची लेन्स स्वच्छ करा

ही एक अत्यंत सोपी ट्रिक असली तरी नक्कीच प्रभावी अशी ट्रिक आहे. कारण स्मार्टफोनच्या कॅमेरा लेन्स दिसतात त्याहूनही अधिक घाण असतात. त्यामुळे त्या पूर्णपणे स्वच्छ केल्याने तुम्हाला चांगले आणि डिटेल्ड फोटो मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे फोटो काढण्यापूर्वी स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची लेन्स नीट साफ करावी. कायमच लेन्सची काळजी घेणं फायद्याचं आहे.

वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

​झूमचा योग्य वापर

फोटो घेण्यासाठी झूम या फीचरचा वापर योग्यरित्या आणि जपून वापरा. कारण अधिक झूम केल्याने फोटोची क्लिअरटी खराब होते. त्यामुळे आवश्यक आणि शक्य असल्यास फोटो घेत असलेल्या ऑब्जेक्टच्या जवळ जा.अधिक झूममुळे फोटोचे रिझोल्यूशन खराब होऊ लागते आणि स्वस्त फोनमध्ये डिजिटल झूम फारसे चांगले नसते. तसेच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे मोड वापरा जेणेकरून फोटो अधिक चांगले येतील. मोबाईल फोनमध्ये पोर्ट्रेट, नाईट, प्रो आणि स्लो-मो असे अनेक पर्याय आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही चांगला फोटो काढू शकता.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

शक्य असल्यास काही अतिरिक्त प्रोडक्ट्स वापरा

DSLR कॅमेऱ्यांप्रमाणे, फोनसाठीही अतिरिक्त प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. जसंकी, ट्रायपॉड, रिंग लाइट आणि अतिरिक्त लेन्स अशा विविध प्रोडक्ट्सचा शक्य असल्यास वापर करावा. या सर्व उपकरणांच्या मदतीने फोटो अधिक भारी येतील. ट्रायपॉडने फोटो स्थिर येतील. रिंग लाईट प्रकाश अॅडजस्ट करेल.

​वाचा: UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

योग्य फोकसही महत्त्वाचा

फ्रेमिंग ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. हे आम्ही वरच सांगितलं. फोटो काढताना ऑब्जेक्टला योग्यठिकाणी ठेवणं महत्त्वाचं आहे. तसंच फोकसही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण फोटो काढताना फोकस योग्य रित्या केल्यावर ऑब्जेक्टचा फोटो अधिक भारी आणि क्लिअर येईल. फ्रेममधून अनावश्यक वस्तू काढून टाकण्यासह फोकसिंग ही एक अत्यंत उपयोगी टिप आहे.

वाचा – चूकीच्या UPI ID वर केलं पेमेंट, घाबरु नका, ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा संपूर्ण रिफंड

​HDR मोडचा वापर

हाय डायनॅमिक रेंज म्हणजेच HDR या मोडच्या मदतीने तुम्ही भारी-भारी दर्जाचे फोटो क्लिक करू शकता. म्हणजेच तुम्ही एखादा मोठा फोटो क्लिक करत असाल तर अशा वेळी तुम्ही HDR वापरू शकता. यासह, तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये बरेच तपशील पाहायला मिळतील. HDR एकाधिक एक्सपोजर कॅप्चर करते आणि फोटोच्या प्रकाश आणि गडद भागांमध्ये चांगले संतुलन राखते. HDR मध्ये पार्क, इमारत, मंदिर किंवा मोठ्या वस्तूचा फोटो क्लिक करणे एक चांगला पर्याय आहे.
वाचा : १८ जूनला Father’s Day, वडिलांना गिफ्ट करण्यासाठी हे आहेत परफेक्ट ऑप्शन

Source link

camera tipsphotography tipssmartphone camerasmartphone photographyफोटोग्राफी टीप्सस्मार्टफोन फोटोग्राफी
Comments (0)
Add Comment