Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Jun 2023, 1:56 pm
Surya Rashi Parivartan In Marathi: आज संध्याकाळी सूर्य बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याला मिथुन संक्रांत म्हणतात. जेव्हा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा लोकांच्या बुद्धीचा विस्तार होतो आणि त्यांच्यात आकर्षण वाढते. सूर्याच्या संक्रमणानंतर, २४ जून रोजी, बुध देखील मिथुन राशीत प्रवेश करेल आणि सूर्यासोबत बुधादित्य योग तयार करेल. जे अनेक राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रगतीदायक ठरेल. सर्व राशींवर सूर्याच्या संक्रमणाचा काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.