किडनी विकावी लागणार नाही, Apple आणणार स्वस्तातील AR हेडसेट, पाहा लाँचिंग डेट-किंमत

Apple चे एआर हेडसेट व्हिजन प्रोला जवळपास ३ लाख रुपये किंमतीत लाँच करण्यात आले. यावरून खूप सारे मिम्स बनवले गेले आहेत. Apple व्हिजन प्रो खरेदी साठी किडनी विकावी लागू शकते, असे म्हटले जात आहे. परंतु, कंपनीने आता एक घोषणा केली आहे की, लवकरच स्वस्तातील व्हिजन प्रो एआर हेडसेटला लाँच करण्यात येणार आहे. यामुळे जास्तीत जास्त यूजर्सपर्यंत कंपनीचे व्हिजन प्रो पोहोचू शकते. कंपनीने स्पष्ट केले आहे की, व्हिजन प्रो स्वस्तात बनवण्यासाठी त्याच्या क्वॉलिटी सोबत कोणताही समझौता केला जाणार नाही.

पाहा कधीपर्यंत होणार लाँच
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अॅपलचे स्वस्त व्हिजन प्रोला २०२५ पर्यंत लाँच केले जाणार आहे. याचाच अर्थ सध्याचे व्हिजन प्रोच्या २ वर्षानंतर लाँच केले जाऊ शकते. अॅपल व्हिजन प्रोला पहिल्यांदा २०२४ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाऊ शकते. जसे, आयफोन आणि आयफोन प्रोला लाँच केले जाते. त्याचप्रमाणे व्हिजन प्रो आणि अॅपल व्हिजनला वेगवेगळ्या किंमतीत लाँच केले जाणार आहे. परंतु, अॅपल व्हिजन प्रोला जवळपास ३ लाख रुपये किंमतीत लाँच करण्यात आले. त्यामुळे अॅपल व्हिजनला ३ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केले जाऊ शकते. परंतु, अॅपल व्हिजन प्रोची खरी किंमत अजून जाहीर केली नाही. याशिवाय, अॅपलकडून सेकंड जनरेसन व्हिजन प्रोला लाँच करण्याची तयारी केली जात आहे. जो फास्ट प्रोसेसर सपोर्ट सोबत येईल.

वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

हे नवीन फीचर्स मिळतील
रिपोर्टच्या माहितीनुसार, अॅपल व्हिजन प्रो मध्ये कॅमेरा आणि सेन्सर ऐरे, ड्युअल अॅपल सिलिकॉन चिप्स आणि ट्विन ४के मायक्रोएलईडी व्हर्च्युअल रियलॅटी डिस्प्लेचा वापर केला जात आहे. परंतु, स्वस्त अॅपल व्हिजन प्रो मध्ये कमी क्वॉलिटीचा स्क्रीनचा ऑप्शन मिळतो. यात आयफोन ग्रेड किंवा जुने मॅक चिप्सचा वापर केला जाऊ शकतो. सोबत कॅमेराची संख्या कमी केली जाऊ शकते.

वाचाः Jio ची खास ऑफर, वर्षभर डेली २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Apple Vision Pro : आंखों, आवाज से कंट्रोल होने वाला रिएलिटी हेडसेट

Source link

Apple Vision ProApple Vision Pro 2023Apple Vision Pro priceApple Vision Pro saleअॅपल स्वस्त व्हिजन प्रो
Comments (0)
Add Comment