या सिक्योरिटी रिसर्चर्सने देखील याबद्दची सूचना दिली असून या ॲप्सना फोनमधून त्वरीत डिलीट करण्यास सांगितलं आहे.
तर गुगल प्ले स्टोअरमधून डिलीट केलेल्या या अॅप्समध्ये SpinOK हा स्पायवेअर मॉड्युल असल्याचं समोर आलं आहे. या स्मायवेअरद्वारे ज्या देखील फोनमध्ये संबधित अॅप्स इन्स्टॉल आहेत, त्या फोनमधील खाजगी डेटा चोरला जाऊ शकतो. तसंच त्या युजरची ॲक्टिव्हिटी देखील ट्रॅक केली जाऊ शकते. धक्कादायक बाब म्हणजे जे देखील अॅप्स धोकादायक आहेत, त्यांना जवळपास ४२ कोटीवेळा डाऊनलोड केलं गेलं आहे.
लगेचच डिलीट करा हे ॲप्स
आतापर्यंत बऱ्याच ॲप्समध्ये हे स्पायवेअर असल्याचं समोर आलं आहे. पण आता काही खास ॲप्सची नावं समोर आली असून यांना गुगलनं प्ले स्टोअरवरुन हटवलं असून युजर्सनाही डिलीट करण्याची सूचना दिली आहे.
‘हे’ आहेत ते ॲप्स
Noizz: video Editor With Music
Zapya-File Transfer, Share
VFly : Video Editor and Video Maker
MVBit-MV video status maker
Biugo-video Maker and Video Editor
Crazy Drop
Cashzine-Earn Money Reward
Fizzo Novel-Reading offiline
CashEm-Get rewards
Domino Master
Lucy jackpot pusher
Tick-Watch to earn
Vibe tik
Mission Guru-Brain Boost
वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स