हायलाइट्स:
- राज ठाकरे यांच्या जातीयवादाच्या आरोपाला शरद पवार यांचे उत्तर.
- राज ठाकरेंवर न बोललेलेच बरे- शरद पवार.
- राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे- शरद पवार.
मुंबई: काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले, असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केल्यानंतर त्यांचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मनसे असा संघर्ष सुरू होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या विषयावर भाष्य करत राज ठाकरे यांना टोला हाणला आहे. राज ठाकरे यांच्यावर न बोललेले बरे, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. (ncp supremo sharad pawar give answer to mns chief raj thackeray)
शरद पवार हे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांना राज ठाकरे यांनी केलेल्या जातीपातीच्या राजकारणाच्या आरोपाबाबत विचारले. त्यावर बोलताना शरद पवार यांनी हे उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्या पक्षावर कोणतेही भाष्य न करता पवार यांनी हा टोला लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा- आता थेट गडकरींना पत्र लिहून विचारणार ‘हे’ प्रश्न; मंत्री उदय सामंत म्हणाले…
या वेळी पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने ओबीसींची आरक्षणावरून फसवणूक केल्याचा आरोप पवार यांनी केला. घटना दुरुस्ती केल्याने आरक्षण मिळेल हा गैरसमज असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकार ओबीसी समाजाची शुद्ध फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांबाबत केले ‘हे’ वक्तव्य
हिंदुत्वाला राजकारणात शह देता यावा यासाठी राज्यात जातीचे राजकारण सुरू झाले का, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वृत्तवाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर या राज्यात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाला असा गंभीर आरोप केला होता.
क्लिक करा आणि वाचा- बीकॉमच्या विद्यार्थ्यानेच मुंबई विद्यापीठाला दिली बॉम्बस्फोटाची धमकी