फ्लिपकार्टच्या मदतीनं सजवा घर, खास सेलमध्ये एसी-कूलरपासून फ्रीज-टीव्हीपर्यंत सर्वांवर डिस्काउंट

नवी दिल्ली : Flipkart Appliances Bonanza : ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर अप्लायन्सेस बोनान्झा सेलचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल १७ जूनपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये विशेष म्हणजे सर्व घरातील गृहउपयोगी वस्तू अतिशय स्वस्तात खरेदी करता येतील. तुम्ही खास प्रोडक्ट्सवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट देखील मिळवू शकता. यामध्ये टीव्हीसह अनेक घरातील कामाच्या वस्तू जसंकी एसी, कूलर, फ्रीज हे सारंकाही स्वस्तात घरी आणू शकता. तर यातील खास ऑफर्स आणि किंमतीवर नजर फिरवू…

टीव्हीपासून वॉशिंग मशीनपर्यंत सर्व काही स्वस्त:
4K स्मार्ट टीव्ही १९,७४९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत घरी आणला जाऊ शकतो. यासोबतच ४,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत वॉशिंग मशीन खरेदी करता येईल. रेफ्रिजरेटर ७९१ रुपयांपासून सुरू होणाऱ्या ईएमआय ऑफरवर आणता येईल. तसंच फॅन आणि कूलर देखील ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर खरेदी केले जाऊ शकतात.

कूलरवरही सूट
जर तुम्ही खास BLDC पंखे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये तुम्ही २,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत फॅन्स घरी आणू शकता. डेझर्ट एअर कूलर ५,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणि पर्सनल कूलर ४,८९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

स्वस्तात एसी खरेदी करण्याचीही संधी
या सेलमध्ये विंडो एसी २४,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. लेटेस्ट लाँच केलेला एसी १९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत घरी आणला जाऊ शकतो. इन्व्हर्टर एसी १८,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणि फिक्स्ड स्प्लीट एसी १८,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकतात.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

किचन अप्लायन्सेसवरही ७५ टक्क्यांपर्यंत सूट

तर वरील सर्व मोठमोठ्या गॅजेट्स व्यतिरिक्त, अशी अनेक उपकरणे आहेत जी कमी किमतीत खरेदी करता येतात. जी घरात खासकरुन किचमध्ये कामाला येणार असून त्यांना तुम्ही ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटवर विकत घेऊ शकता. यामध्ये हँड ब्लेंडर, इलेक्ट्रिक कुकर, मायक्रोवेव्ह अशी उपकरणं अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.

वाचा – चूकीच्या UPI ID वर केलं पेमेंट, घाबरु नका, ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा संपूर्ण रिफंड

Source link

AC Saleflipkart appliances bonanzaflipkart saletv discountफ्लिपकार्टफ्लिपकार्ट सेल
Comments (0)
Add Comment