SIM Card Fraud: तुमच्या नावावर किती सिमकार्ड? अवघ्या मिनिटाभरात जाणून घ्या

सध्या आधार नंबर किंवा कोणत्याही आयडी कार्डवरून फ्रॉड करणे खूपच सोपे झाले आहे. तुमच्या आयडीचा वापर करून फेक सिम कार्ड खरेदी केले जाऊ शकते. त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला खूपच अलर्ट राहण्याची गरज आहे. जर तुमच्या नावावर अन्य कुणी सिम कार्डचा वापर करीत तर नाही ना?, असं तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी दिलेली माहिती तुमच्या खूप उपयोगाची पडू शकते. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला मोबाइल नंबरच्या मदतीने सिम कार्ड्सचे स्टेट्सची माहिती आणि किती कनेक्शन आहेत, याची माहिती जाणून घेऊ शकता. जाणून घ्या डिटेल्स.

असं चेक करा
आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी दूरसंचार विभागाने माहिती दिली आहे. यासाठी एक पोर्टल सुद्धा लाँच केले आहे. या पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर किती अन्य सिम कार्ड आहेत. हे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला मोबाइल फोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने सरकारी वेबसाइट tafcop.dgtelecom.gov.in वर जावे लागेल. या ठिकाणी एका बॉक्समध्ये आपला १० अंकी मोबाइल नंबर टाकावा लागेल. यानंतर तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर चालू मोबाइल नंबरची माहिती मिळू शकते. जी तुमच्या आयडीशी लिंक आहे.

वाचाः Jio ची खास ऑफर, वर्षभर डेली २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

ब्लॉक सुद्धा करू शकता नंबर
जर या नंबर पैकी कोणताही असा नंबर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या नंबर संबंधी रिपोर्ट करू शकता. यानंतर सरकार त्या नंबरचा तपास करून त्या नंबरला ब्लॉक करू शकते. यासाठी तुम्हाला पाठपुरावा घ्यावा लागेल. एका आयडीवर जास्तीत जास्त ९ सिम कार्ड जारी केले जाते. परंतु, काही राज्य असे आहेत ज्यात आसाम, जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व राज्यात एका आयडीवर जास्तीत जास्त ६ सिम कार्ड दिले जाऊ शकतात.

वाचाः फोन नंबर बदललाय?, तत्काळ आधार कार्डला करा अपडेट, फक्त ५० रुपये खर्च

आपके नाम पर कोई भी खरीद सकता है SIM!

Source link

How to Check Sim cardHow to Check Your SimHow to Check Your Sim cardSIM Cardsim card fraudSIM Card Rules
Comments (0)
Add Comment