देवपूजा करताना नकळत तुमच्या कडूनही होतात ‘या’ चुका? जाणून घ्या देवपूजेची सोपी पद्धत

देवपूजा करताना काही महत्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत, त्यामुळे नक्कीच लक्ष्मी माता तुमच्या वर प्रसन्न राहील. घरात देवपूजा हि दररोज केली पाहिजे. दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते. देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते.

देवपूजा कशी करावी


देव पूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून, देवासमोर बसावे. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा. प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे. त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी, शंख जलाने भरावा. त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंख जल प्रोक्षण करावे. भुशुद्धी, भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरवात करावी.

सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे. देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी. कपाळाला गंध लावून घ्यावा. समई आणि उदबत्ती लावून घ्यावे आणि समईला गंध लावून घ्यावा. त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी. सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवांना टिळा लावावा. तसेच सगळ्या देवांना फुल वाहवेत, नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरंजन लावून आरती करावी.

देवाची पूजेसाठी काही नियम

देव पूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी.
देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे. तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे.
पूजेला सुरुवात करताना स्वत:च्या कपाळाला कुंकवाचा टिळा, गंध लावून घ्यावे.
पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे.
देवपूजा करताना मध्येच उठू नये.
पूजा करताना घंटा हि देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी.
शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा.
तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे.
विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करावे.
नारळ ठेवताना नारळाची शेंडी हि देवाकडे करावी.
पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये.
देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये. तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये.

Source link

dev pujadevghardevghar puja niyam in marathirules of daily worship at homeआरतीदेवघरदेवपूजादेवपूजा कशी करावीदेवपूजेचे नियम
Comments (0)
Add Comment