बीएचआर घोटाळा : ‘या’ आमदाराला मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

हायलाइट्स:

  • बीएचआर सोसायटीमधील घोटाळा प्रकरणी आमदाराला दिलासा
  • न्यायालयाने अटकपूर्व जामीन केला मंजूर
  • मात्र दहा दिवसांच्या आत ५५ लाख ४० हजार रुपये कर्ज भरावे लागणार

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर सोसायटीमधील घोटाळा प्रकरणी बडे कर्जदार असलेल्या आमदार चंदुलाल पटेल यांना पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र आमदार पटेल यांना दहा दिवसांच्या आत ५५ लाख ४० हजार रुपये कर्ज भरण्याची अट न्यायालयाने घातली आहे.

या गुन्ह्यातील संशयित तथा बीएचआरचे मोठे कर्जदार आमदार चंदुलाल पटेल यांनी पुण्याच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सोमवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. पटेल यांनी बीएचआरमधून २ कोटी रुपये कर्ज घेतलं आहे. हे कर्ज भरलं नसल्यामुळे व्याजासहीत ३ कोटी ८० लाख थकबाकी झाली आहे. यातील ७० लाख रुपये पटेल यांनी फेडले तर २ कोटी ७७ लाख रुपयांच्या पावत्या मॅचींग केल्या आहेत. त्यामुळे आता त्यांना २ कोटी ७७ लाखांच्या २० टक्के म्हणजेच ५५ लाख ४० हजार ऐवढी रक्कम दहा दिवसांच्या आत भरायची आहे.

पवारांनी फक्त पुतण्या, मुलगी, नातवालाच मोठे केले!; ‘या’ आमदाराची टीका

आमदार चंदुलाल पटेल यांना तीन महिन्याच्या आत आणखी २० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. पटेल यांच्यातर्फे अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तीवाद केला.

झंवरला नाशिकमध्ये आणून चौकशी

दरम्यान याप्रकरणी अटकेत असलेल्या सुनील झंवर याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी नाशिक येथे नेऊन चौकशी केली. झंवर हा बेपत्ता असताना बराच काळ नाशिकमध्ये थांबला होता. तेथे बीएचआरशी संबधित अनेक लोकांच्या त्याने भेटी घेतल्या. नाशिकमध्ये देखील बीएचआरच्या मालमत्तांचे बेकायदेशीर लीलाव झाल्याचा संशय आहे. त्यामुळेच झंवरला नाशिकमध्ये नेऊन तपास केल्याची माहिती आहे.

Source link

bhr scam jalgaonjalgaon newsजळगावजळगाव न्यूजबीएचआर घोटाळा
Comments (0)
Add Comment