जर तुमचे फेसबुक अकाउंट कंपनीकडून लॉक करण्यात आले तर तुम्ही काय कराल?, कदाचीत तुम्ही तक्रार करू शकता. परंतु, एका व्यक्तीने त्याचे अकाउंट लॉक करण्यात आल्यानंतर फेसबुकला थेट कोर्टात खेचले. यूएस येथील एका वकिलाने फेसबुकवर आरोप केला की, कंपनीने त्यांचे अकाउंट बंद केले आहे. वकिलाने कंपनीवर खटला दाखल केला. तसेच फेसबुकच्या विरोधातील खटलाही जिंकला आहे. कोर्टाने फेसबुकला ५० हजार डॉलर म्हणजेच जवळपास ४१ लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
जेसन क्रॉफर्डने फेसबुक विरोधात खटला दाखला केला. फेसबुकने कोणतेही लॉजिक न वापरता आपले फेसबुक अकाउंट ब्लॉक केले आहे. या अकाउंटला ब्लॉक यासाठी करण्यात आले होते की, त्या व्यक्तीने काही राजकीय टिप्पणी केली होती. यासाटी अकाउंटला उल्लंघन केल्याची नोटीस मिळाली होती. परंतु, दुसऱ्या वेळी कोणतेही कारण न देता अकाउंट लॉक करण्यात आले होते. त्या व्यक्तीने आपले अकाउंट अनलॉक करण्यासाठी फेसबुकशी कॉन्टॅक्ट केला. परंतु, कंपनीने कोणतेही उत्तर दिले नाही. ती व्यक्ती आपले अकाउंट लॉगइन करीत होती. परंतु, फेसबुकने त्याची दखल न घेतल्याने त्या व्यक्तीने थेट कोर्टाची पायरी चढली व फेसबुकला कोर्टात खेचले. तसेच फेसबुक विरुद्धा कोर्टात खटला जिंकला.

वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा
कॉफर्ड स्वतः वकील आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये फेसबुकच्या विरोधात एक तक्रार केली होती. ज्यात दावा करण्यात आला होता की, कंपनीने बाल यौन शोषणच्या उल्लंघनाच्या आधारावर आपले अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. परंतु, असे काहीही घडले नाही. सर्वात खास बाब म्हणजे केस फाइल झाल्यानंतर सुद्धा फेसबुककडून कोणतीही कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली नाही. ज्यावेळी कोर्टाने फेसबुकच्या टीमला इग्नोरेंससाठी कॉफर्डला ५० हजार डॉलरची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. त्यानंतर कंपनीने त्या व्यक्तीशी संपर्क केला.
वाचाः फोन नंबर बदललाय?, तत्काळ आधार कार्डला करा अपडेट, फक्त ५० रुपये खर्च
वाचाः हे LED Bulb नाही तर Inverter आहे, विजेविना अनेक तास सुरू राहते