JioTag म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
जिओ टॅग हे एक लहान पण पावरफुल ब्लूटूथ ट्रॅकिंग डिव्हाइस आहे जे स्मार्टफोनमधील ॲपच्या मदतीने वस्तूंना ट्रॅक करु शकते. JioTag वापरकर्त्यांना त्यांच्या वस्तू सहज शोधण्यात मदत करते. बॅग, वॉलेट किंवा कीचेन असो, वापरकर्ते JioTag कोणत्याही गोष्टीशी अटॅच करू शकतात आणि त्याचे ठिकाण पटकन ट्रॅक करू शकतात. म्हणजेच JioTag ज्या गोष्टीला अटॅच आहे त्याचा मागोवा घेण्यास मदत करते. याची बॅटरी लाइफ एक वर्ष आणि २० मीटर घरामध्ये आणि ५० मीटर घराबाहेर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. JioTag रिटेल बॉक्सच्या आत, तुम्हाला एक खास दोरी आणि एक अतिरिक्त बॅटरी मिळेल. या उपकरणाच्या मदतीने स्मार्टफोनही ट्रेस करता येतो. JioTag मध्ये डबल-टॅप फीचरही आहे, ट्रिगर केल्यावर, वापरकर्त्याचा फोन सायलेंट मोडवर सेट केला असला तरीही वाजतो. JioTag वापरकर्त्यांना अलर्ट देखील करते की त्यांनी टॅग केलेल्या वस्तू उदा. वॉलेट, किल्ली कुठेतरी विसरले आहेत.
JioTag कोणासाठी आहे?
JioTag त्यांच्या वैयक्तिक वस्तू सहजपणे विसरणाऱ्या आणि टॅगच्या मदतीने ट्रॅक करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. जे विसराळू आहेत, प्रवासी आहेत आणि ज्यांना आपली मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवायची आहे त्यांच्यासाठी हे आहे. हा टॅग पाळीव प्राण्यांसाठी देखील वापरला जाऊ शकतो. म्हणजेच पाळीव प्राण्यांचा ठावठिकाणा शोधण्यात मदत करण्यासाठी त्यांना टॅग देखील जोडले जाऊ शकतात. जर JioTag ची तुलना Apple AirTag शी केली तर किंमतीच्या बाबतीत जिओटॅग फारच स्वस्त असल्याने एक भारी चॉईस आहे. JioTag ची सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार किंमत ७४९ रुपये ठेवली गेली आहे.
वाचा: UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो