या प्लानच्या संपूर्ण वैधते दरम्यान ३०० एसएमएस देखील दिले जातील. तसंच ५ रुपयांचा टॉकटाइमही उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय विंक म्युझिक आणि फ्री हॅलोट्यूनची सुविधा देखील देण्यात येत आहे. १९९ रुपयांमध्ये डेटा कमी दिला जात आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कमी किंमतीत प्लान हवा असेल आणि डेटाची आवश्यकताही कमी असेल, तर तुम्हाला हा प्लान आवडू शकतो.
वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल
जिओसोबत आहे तगडी टक्कर
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओने देखील १९९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. त्याला ३० नाही तर २३ दिवसांची वैधता दिली जात आहे. पण यात १.५ जीबी टेडा दररोजसाठी मिळणार आहे. म्हणजेच संपूर्ण वैधते दरम्यान, वापरकर्त्यांना या प्लानमध्ये ३४.५ GB डेटा दिला जाईल. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. दररोज १०० एसएमएस दिले जातील. यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वरही प्रवेश दिला जाईल.
वाचा : Aadhar Update : मोफत ऑनलाइन आधार अपडेटची तारीख वाढवली, १४ जून नाही ‘या’ तारखेपर्यंत आहे संधी