WhatsApp चे खास फीचर्स आहेत एकदम खास, अनेकांना माहितही नाहीत…

प्रायव्हेट मेसेज फीचर

व्हॉट्सॲपवर ग्रुप चॅट दरम्यान, काही वेळा तुम्हाला एखाद्या विशिष्ट मेसेजला वैयक्तिकरित्या उत्तर द्यायचे असते. यासाठी तुम्ही ‘ Reply Privately’ हे खास फीचर वापरू शकता.
कसं वापराल हे प्रायव्हेट मेसेज फीचर?
तुम्हाला रिप्लाय द्यायचा असलेल्या मेसेजवर टच करुन त्याला होल्ड करून ठेवा. त्यानंतर वरच्या उजव्या कोपर्यात ‘3-डॉट’ चिन्हावर टॅप करा आणि येथे Reply Privately हा पर्याय निवडा त्यानंतर तुम्ही खाजगीरित्या उत्तर देऊ शकता.

वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

​स्टेटसवर लावा ऑडिओ क्लिप

WhatsApp च्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये एक व्हॉइस नोट्स शेअर करण्याची सोय दिली गेली आहे. तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्सना ऐकवण्यासाठी तुमच्या स्टेटसमध्ये व्हॉइस क्लिप जोडू शकता.
व्हॉइस स्टेटस तयार करण्यासाठी सोप्या स्टेप्स
WhatsApp उघडा आणि स्टेटस टॅबवर टॅप करा. खालच्या उजव्या कोपर्‍यातील पेन्सिलचे चिन्ह निवडा. त्यानंतक मायक्रोफोन चिन्हावर टॅप करा आणि आवाज रेकॉर्ड करा. यानंतर फोटो स्टोरीप्रमाणे शेअर करा. येथे फक्त ३० सेकंदांचा ऑडिओ शेअर करता येईल.

वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

नंबर सेव्ह न करता करा चॅट

जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना कामासाठी दररोज अनोळखी लोकांशी चॅटिंग करावी लागत असेल, तर ही WhatsApp ट्रिक तुमच्यासाठी आहे. यात नंबर सेव्ह न करता चॅट करु शकता. यासाठी आधी तुम्हाला त्या नंबरसाठी व्हॉट्सअॅप लिंक तयार करावी लागेल, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीशी चॅट आपोआप उघडेल. उदाहरणार्थ, तुम्हाला +911234567890 या क्रमांकावर चॅट करायचे असल्यास, तुम्हाला या URL वर जावे लागेल आणि https://wa.me/911234567890 वर जाऊन चॅट करु शकता.

वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच

​होम स्क्रीनवर WhatsApp चॅट शॉर्टकट कसा जोडाल?

Android साठी WhatsApp वर, तुम्ही तुमच्या होमस्क्रीनवर कोणताही चॅट शॉर्टकट जोडू शकता. यासाठी आधी कोणतंही WhatsApp चॅट उघडा ज्याचा शॉर्टकट तयार करायचा आहे. त्यानंतर वरच्या उजव्या कोपर्‍यात मेनूवर टॅप करा. अधिक पर्यायांवर टॅप करा आणि ‘शॉर्टकट जोडा’पर्याय निवडा. त्यानंतर ‘जोडा’ बटण दाबा, त्यानंतर एक शॉर्टकट तयार होईल.

वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?​

​विशिष्ट लोकांपासून प्रोफाइल फोटो हाईड करा

काही लोकांनी तुमचा प्रोफाईल फोटो पाहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर व्हॉट्सअॅप तुम्हाला खास पर्याय देतो.यासााठी आधी WhatsApp उघडा आणि सेटिंग्जमध्ये जा, ‘Privacy’ पर्याय निवडा. त्यानंतर ‘प्रोफाइल फोटो’ वर टॅप करा. नग ‘माझे My Contacts’ किंवा ‘My Contacts Except’ यातील एक पर्याय निवडा. त्याानंतर तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो ज्यांना पाहू द्यायचा नाही त्यांना मार्क करा.

​वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा

Source link

WhatsAppwhatsapp appWhatsApp featureswhatsapp messagewhatsapp messengerव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप मेसेंजरव्हॉट्सॲप मेसेज
Comments (0)
Add Comment