जिओचा बचतीचा प्लान, वर्षभर डेली फ्री १.५ जीबी डेटा आणि कॉलिंग, ६८३ रुपयाची बचत

जिओकडून अनेक प्रकारचे प्लान आणले गेले आहेत. या प्लानमध्ये डेली फ्री डेटा प्लान आणि कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत हा मंथली प्लान अनेक प्रकारे जबरदस्त आहे. जर तुम्ही मंथली प्लान रिचार्ज करीत असाल तर डेली १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगचा प्लान वर्षभरासाठी ६८३ रुपयांहून जास्त पैसे द्यावे लागू शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी जिओचा २५४५ रुपयाचा वार्षिक प्लान बेस्ट ठरू शकतो. जाणून घ्या या प्लान संबंधी डिटेल्स.

जिओचा २५४५ रुपयाचा प्लान
या प्लानमध्ये यूजर्सला ३३६ दिवसाची वैधता मिळते. सोबत डेली १.५ जीबी डेटा दिला जातो. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64kbps इतकी राहते. या प्लानमध्ये अनलिमिटेड ५जी कॉलिंगची सुविधा मिळते. या हिशोबाप्रमाणे एकूण ५०४ जीबी डेटा ऑफर केले जाते. सोबत कॉलिंगसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, डेली १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.

वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा


६८३ रुपयाची बचत

रिलायन्स जिओकडून डेली १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगचा मंथली प्लान २६९ रुपयात येतो. या प्लानमध्ये एकूण ४२ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये जिओ सावनचे फ्री सब्सक्रिप्शन वेगळे आणले आहे. बाकी सर्व प्लानचे बेनिफिट्स २४४५ रुपयाच्या वार्षिक प्लान सारखेच आहेत. जर तुम्ही मंथली प्लान २६९ रुपयाचा प्लान रिचार्ज करीत असाल तर १२ वेळा रिचार्जसाठी ६८३ रुपये जास्त द्यावे लागतात. तर २५४५ रुपयाचा प्लान रिचार्ज करीत असाल तर इतक्या पैशाची बचत करू शकता.

वाचाः आयफोनचे अमिष पडले भारी, मुंबईतील तरुणाला ४.२६ लाखाला लागला चुना, ही चूक करू नका

वाचाः Jio Cinema वर बिग बॉस OTT 2 पाहा एकदम फ्री, पाहा डिटेल्स

Cyclone Biparjoy Impact: Free में करें किसी भी Network पर कॉलिंग और डेटा का Use

Source link

jio planjio plansjio plans offerReliance Jioreliance jio planReliance Jio Saving Plan
Comments (0)
Add Comment