तर जिओचा हा २,९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान ३६ दिवसांच्या वैधतेसह येतो. खास गोष्ट म्हणजे कंपनी या प्लानमध्ये २३ दिवसांची अधिकची व्हॅलडिटीही देत आहे. तसंच दररोज २.५ जीबी डेटा या प्लानमध्ये ऑफर केला जात असून दिवसाला १०० एसएमएसही आहेत. आणखी एक खास गोष्ट म्हणाल तर कंपनी अधिकचा ७५ जीबी डेटा ग्राहकांना या प्लानमध्ये देत आहे. याशिवाय Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
जिओचा २,८७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा वर्षभराच्या व्हॅलिडिटीसह येणारा आणखी एक प्लान हा २,८७९ रुपयांचा आहे. म्हणजेच हा रिचार्जही एकदा केला की ग्राहकांना एक वर्षासाठी रिचार्जचं टेन्शन राहणार नाही. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण ७३० जीबी डेटाचा फायदा घेता येईल. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps इतका कमी होतो. वरच्या प्लानप्रमाणे यातही अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस आणि JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल