पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती, जाणून घ्या पात्रता…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महापालिकेतील भरतीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षा लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच महापालिकेतर्फे तिसऱ्या टप्प्याची भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रामुख्याने अभियंता पदासाठी आहे. जुलैअखेरपर्यंत या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. अभियंत्यांच्या भरतीसाठी नियमावली आणि आकृतीबंधातील बदलासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात येणार आहे.महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी ही माहिती दिली. महापालिकांमधील भरतीवर राज्य सरकारने लादलेली बंदी उठवल्यानंतर पहिल्यांदा पुणे महापालिकेने भरती सुरू केली. यात विविध ४४८ पदांची भरती यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३२० पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यासाठी परीक्षांच्या तारखा घोषित झाल्या आहेत. महापालिका प्रशासनाने भरतीच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे, असे विक्रमकुमार यांनी सांगितले.

कनिष्ठ अभियंता पदाच्या १५० जागांसाठी लवकरच भरती प्रक्रिया जाहीर करण्यात येईल. साधारण जुलैअखेर यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल. या भरतीच्या वेळी समाविष्ट गावे आणि थेट कार्यकारी अभियंता या पदावर भरतीसाठी आकृतीबंधात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात येणार असल्याचेही विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर लगेचच भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. या भरतीत कनिष्ठ अभियंता वर्गाची १५० आणि कार्यकारी अभियंता पदाच्या नऊ ते १० पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
Pune News : ‘एसटीपीं’साठी १४०० कोटी; समाविष्ठ गावांमध्ये आठ प्रकल्प उभारणार
थेट कार्यकारी अभियंता भरती

महापालिकेत नवी गावे समाविष्ट झाल्याने ग्रामपंचायतींचे काही कर्मचारी महापालिकेकडे वर्ग झाले आहेत; परंतु त्यामुळे महापालिकेच्या आकृतीबंधात बदल करून अभियंत्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. यासोबतच महापालिकेकडे नगर अभियंता पद; तसेच अधीक्षक अभियंता पदापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेले उमेदवार, त्यांचा सेवेतील उर्वरित कार्यकाल लक्षात घेऊन भविष्यात अनेक वरिष्ठ पदे रिक्त राहण्याची शक्यता आहे. यासाठी थेट कार्यकारी अभियंत्यांची भरती करण्यासाठी आकृतीबंधात बदल करावे लागतील. या संदर्भातील पदसंख्या आणि आवश्यक बदलांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

Source link

job in maharashtramahanagar palika bhartipune municipal commissionerPune Municipal CorporationPune Municipal RecruitmentRecruitment Newsstate government
Comments (0)
Add Comment