कशी झाली फसवणूक
रिपोर्टच्या माहितीनुसार, या तरुणाच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. त्यात लकी ड्रॉ मध्ये आयफोन जिंकण्याची ऑफर दिली गेली होती. कंपनीने आयफोन १४ प्रो मॅक्स जिंकण्याची ऑफर दिली होती. पीडित तरुण एका फर्निचर दुकानाचा मालक आहे. ज्यावेळी या तरुणाने आयफोन जिंकण्यासाठी क्लेम केला. तर त्या व्यक्तीला सांगितले गेले की, सर्वात आधी तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. या पीडित तरुणाला हे खरे वाटले त्याने जवळपास ४.२६ लाख रुपये पे केले. परंतु, एव्हढे सगळं होऊनही त्याला आयफोन मिळाला नाही. नंतर पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार नोंदवली.
वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा
या चुका तुम्ही करू नका
- आयफोन कितीही सुरक्षित असू द्या, परंतु, तुम्ही तुमच्याकडून चुका करीत असाल तर यासारख्या फ्रॉडला कुणीच रोखू शकत नाही.
- अनेकदा व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर फ्रॉडचे मेसेज येत असतात. परंतु, तुम्हाला जर कोणताही मेसेज संशयास्पद वाटत असेल तर त्यावर क्लिक करू नका.
- कोणत्याही अमिषाला तुम्ही बळी पडू नका. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू नका.
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत ओटीटी शेअर करू नका.
वाचाः Jio Cinema वर बिग बॉस OTT 2 पाहा एकदम फ्री, पाहा डिटेल्स वाचाः फोन नंबर बदललाय?, तत्काळ आधार कार्डला करा अपडेट, फक्त ५० रुपये खर्च