वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

हायलाइट्स:

  • वाघाच्या हल्ल्यात आणखी एक बळी
  • शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याने गमावले प्राण
  • गावकऱ्यांनी केली कुटुंबासाठी आर्थिक मदतीची मागणी

गडचिरोली : बैल घेऊन शेतावर गेलेल्या एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा गावानजीकच्या जंगलात सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. डंबाजी लक्ष्मण डोंगरे (५०) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

डंबाजी डोंगरे यांच्या शेतालगत जंगल आहे. १५ ऑगस्टला दुपारी ते बैलजोडी घेऊन शेतावर गेले होते. परंतु संध्याकाळ होऊनही डंबाजी हे घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाही. सोमवारी सकाळी जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस?; आता समन्स चूकवला तर…

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वन संरक्षक मनोज चव्हाण, पोर्ला वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी, शेत्र सहाय्यक बोरावार, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

दरम्यान, मृत डंबाजी डोंगरे यांच्या शरीरावरील जखमांवरून त्यांना वाघाने ठार केल्याचा निष्कर्ष वनाधिकाऱ्यांनी काढला आहे. या घटनेनंतर डोंगरे कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करून वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Source link

gadchirolitiger attackगडचिरोलीवाघाचा हल्लाशेतकरी
Comments (0)
Add Comment