Google चा Call is Being Recorded चा मेसेज
Google ने लोकांना परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. Google डायलर आणि अगदी संबंधित फोन तयार करणाऱ्या कंपन्याच्या डायलरमध्ये, देखील “हा कॉल रेकॉर्ड केला जात आहे” असा इंग्रजी व्हॉइस मेसेज प्ले केला जाईल असं फीचर टाकलं आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीने कॉल रेकॉर्डिंग चालू केल्यावर समोरच्याला हा मेसेज ऐकू जातो आणि कळून येतंकी हा मेसेज रेकॉर्ड केला जात आहे. त्यामुळे हा मेसेज कॉल रेकॉर्ड होत आहे का? हे जाणून घेण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
वाचा : Twitter देणार YouTube ला टक्कर, लवकरच स्वत:चं व्हिडीओ ॲप लाँच करणार
जुने थर्ड-पार्टी ॲप्स
Google ने 2022 मध्ये कॉल रेकॉर्डिंगसंबधित काही नियम आणले. दरम्यान त्यामुळे त्यापूर्वीचे ॲप्स अद्याप अलर्ट संदेशाशिवाय तुमचे कॉल रेकॉर्ड करू शकतात. म्हणूनच Google चे नवीन धोरण दुसऱ्या टोकावरील कोणीतरी तुमचे कॉल रेकॉर्ड करण्याची शक्यता पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. अशा परिस्थितीत, आपण इतरही प्रकारच्या गोष्टींचं लक्ष ठवून पुढे दिलेल्या काही टिप्सवरही लक्ष ठेवले पाहिजे.
वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
लक्ष देऊन बीप ऐका
तुम्ही समोरच्याचा कॉल उचलताच बीपच्या आवाजाकडे लक्ष दिले पाहिजे. फोन कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला बीप ऐकू येत असल्यास, तुमचा फोन रेकॉर्ड केला जात आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला बीप व्यतिरिक्त इतर काही आवाज ऐकू येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.
वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल
समोरचा कमी बोलत असेल तरी समजून जा
जेव्हा दुसऱ्या टोकावरील कोणीतरी तुमचा कॉल रेकॉर्ड करत असेल, तेव्हा ते शक्य तितके कमी बोलण्याचा प्रयत्न करतील. दुसरी व्यक्ती तुम्हाला अधिक माहिती विचाारु शकते, पण ते स्वतःच बहुतेक वेळ शांत राहू शकतात. जर कोणी हे विचित्र पद्धतीने करत असेल तर असे होऊ शकते की तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात आहे.
वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच
कोणत्या विषयावर कशी चर्चा सुरु आहे, त्यावरुनही समजू शकते.
वर सांगितल्याप्रमाणे जर समोरचा तुम्हालाच फक्त बोलायला लावत असेल तर समजू शकता तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. तसंच कोणत्या विषयावर आणि कसं बोलणं सुरु आहे, हे देखील महत्त्वाचं आहे हे समजून घेण्यासाठी की तुमचा फोन रेकॉर्ड होत आहे का? कॉल रेकॉर्ड करणारे कायम तुमच्याकडून अधिक माहिती काढून घेत असतात.
वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?