Dell Laptop अर्ध्या किंमतीत विकत घेण्याची संधी, Amazon वर सुरु आहे दमदार सेल

नवी दिल्ली :Dell Laptop Discount on Amazon : लॅपटॉप ही एक महत्त्वाची वस्तू असून बऱ्याच काळासाठी म्हणून विकत घेतली जाते. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यावेळी लॅपटॉपसाठी किती पैसे खर्च करणार याचा विचार करणेही महत्त्वाचे असते. त्यात आता Amazon वर खास लॅपटॉपचा सेल सुरु असून यामध्ये Dell Laptop अगदी निम्म्या किंमतीत विकत घेण्याची संधी आहे. लॅपटॉप्ससाठी प्रसिद्ध असलेल्याने डेलचे लॅपटॉप नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. तुम्हालाही या कंपनीचा लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्हाला Amazon च्या काही ऑफर्सची माहिती असणे आवश्यक आहे. हे लॅपटॉप खरेदी करण्यावर तुम्हाला जी सूट मिळणार आहे ती तुम्हाला ते खरेदी केल्यावर मोठा फायदा देऊ शकते. चला तर या ऑफर्सबद्दल जाणून घेऊ…

तुम्ही Amazon वरून Dell Vostro 3420 लॅपटॉप ऑर्डर करू शकता. कारण ॲमेझॉनवर सेल आधीच सुरू झाला आहे. डेल वोस्ट्रो 3420 लॅपटॉपची मूळ किंमत ६१,८१७ रुपये आहे आणि तुम्ही ३३% सवलतीनंतर ४१स ४९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. याशिवाय जुना लॅपटॉप Amazon ला परत केल्यावर तुम्हाला १६,६५९ रुपयांची सूट मिळू शकते. तसाच Dell Inspiron 3511 लॅपटॉप, Intel i3 प्रोसेसरसह ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. या लॅपटॉपची मूळ किमत ५५,०४७ रुपये आहे आणि तुम्ही ३०% सवलतीनंतर ३८,४९० मध्ये ऑर्डर करू शकता. Amazon ला जुना लॅपटॉप परत केल्यावर तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये १६,६५० रुपयांची सूट मिळू शकते.

डेलच्या नवीन लॅपटॉपवर दमदार सूट
डेल वोस्ट्रो 3510 लॅपटॉप, कमी किंमतीत लॅपटॉप खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी इंटेल कोअर i5 सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. या लॅपटॉपची मूळ किंमत ७०,५४५ रुपये आहे आणि तुम्ही २६% डिस्काउंटनंतर ५२,४९० रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय अनेक बँक ऑफर्सही त्यावर चालू आहेत, ज्यामुळे ते खूपच स्वस्त मिळू शकतात.

वाचा : Twitter देणार YouTube ला टक्कर, लवकरच स्वत:चं व्हिडीओ ॲप लाँच करणार

Source link

amazon saleDell Laptopdell laptop offerlaptopडेल लॅपटॉपलॅपटॉप सेल
Comments (0)
Add Comment