जिओचा २९९ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच, Dell 2 GB डेटानुसार एकूण 56 GB डेटा ऑफर केला जातो. याशिवाय कॉलिंगसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये डेली फ्री १०० एसएमएसची सुविधा देखील आहे. तसंच, या प्लानमध्ये अमर्यादित 5G सेवा उपलब्ध आहे. याशिवाय Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.
जिओचा २४९ रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये २३ दिवसांची वैधता आहे. हा प्लान रोजच्या 2 GB डेटानुसार येतो. त्यानुसार यात एकूण 46 GB डेटा ऑफर केला जातो. तसेच, कॉलिंगसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. यासोबतच दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. या प्लानमध्ये Jio, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जात आहे. हा प्लान अमर्यादित 5G डेटाच्या सुविधेसह येतो.
५० रुपयांमध्ये 10 GB अतिरिक्त डेटा
Jio २९९ रुपये आणि २४९ रुपयांच्या प्लानमध्ये तुलना केली तर दोन्ही प्लॅनमध्ये ५० रुपयांचा फरक आहे. पण ५० रुपयांच्या फरकासाठी, वापरकर्त्यांना 10 GB अतिरिक्त डेटासह ५ दिवसांची अतिरिक्त वैधता देखील ऑफर केली जाते. दोन्ही योजनांमध्ये इतर सर्व वैशिष्ट्ये समान आहेत. त्यामुळे दोन्ही प्लान बेस्ट असून आपल्या गरजेनुसार युजर्स प्लान घेऊ शकतात.
वाचा : Twitter देणार YouTube ला टक्कर, लवकरच स्वत:चं व्हिडीओ ॲप लाँच करणार