आता सारखं चार्जिंगचं टेन्शनच राहणार नाही, ‘हे’ तीन Smartphones आहेत एकदम बेस्ट

Bigger Battery Smartphones : आजकाल बाजारात लाँच होणाऱ्या अधिक स्मार्टफोन्समध्ये दमदार बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि भारी डिस्प्ले यांसारखे फीचर्स असतात. तसंच आजकाल वाढत्या वापरामुळे बहुतेक वापरकर्ते देखील स्मार्टफोन खरेदी करताना बॅटरीकडे लक्ष देतात जेणेकरून वापरादरम्यान त्यांना वारंवार चार्जिंगच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे जर तुम्हालाही मोठ्या बॅटरी क्षमतेचा फोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट कमी असेल, तर तुम्ही Samsung, Techno आणि Realme चे काही पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

Samsung Galaxy M33 5G (किंमत १८,४९९ रुपये)
Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन Amazon वर १८,४९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. हा बँक ऑफर, नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरसह मिळू शकतो. ही किंमत 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची आहे. याचे फीचर्स म्हणाल तर तब्बल 6000mAh ची बॅटरी आहे, जी चांगलं बॅटरी बॅकअप देते. तसंच फोनमध्ये ६.६ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे जो फुलएचडी+ रिझोल्यूशन ऑफर करतो. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेल प्राइमरी, ५ मेगापिक्सल आणि २-२ मेगापिक्सलचे दोन असा क्वॉड रेयर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ गापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Tecno POVA 4 (किंमत ११,९९९ रुपये)
Tecno Pova 4 स्मार्टफोन Amazon India वरून ११,९९९ रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फोनवर नो-कॉस्ट ईएमआय, बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील आहेत. टेक्नोचा हा हँडसेट 2.2 GHz MediaTek Helio G99 प्रोसेसरसह येतो. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये ५० मेगापिक्सेलचा प्राथमिक रेअर कॅमेरा आहे तसंच ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. या टेक्नो स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह ६.८ इंचाचा डॉट-इन डिस्प्ले आहे.

Realme narzo 50A (किंमत ९,९९९ रुपये)
Realme Narzo 50A स्मार्टफोन ९,९९९ रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फोनवर नो-कॉस्ट ईएमआय, बॅक आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत. ही किंमत 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची आहे. Realme Narzo 50A चे इतर फीचर्स म्हणाल तर बेस्ट म्हणजे 6000 mAh ची बॅटरी आहे. तसंच स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ६.५ इंच HD+ डिस्प्ले आहे. हा फोन ही ५० मेगापिक्सेल ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअपसह येतो.

वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Source link

big battery smartphonesrealme phonessamsung phoneबॅटरी स्मार्टफोन्ससॅमसंग स्मार्टफोन्सस्मार्टफोन्स​Smartphones
Comments (0)
Add Comment