आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जगभरात मानवाचे कामकाजापासून ऑटोमेशन पर्यंत सर्वच क्षेत्रात याची मक्तेदारी वाढत आहे. आतापर्यंत चॅटजीपीटीची खास चर्चा सुरू होती. परंतु, आता पोलीस रोबोट चर्चेत आला आहे. याचाच अर्थ पोलिसाचे काम रोबोट पाहणार आहे. ट्रॅफिक पासून सुरक्षा व्यवस्थे पर्यंत सर्व जबाबदारी रोबोट पार पाडू शकणार आहे. त्यामुळे आगामी दिवसात अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी म्हणून रोबोट दिसू शकतात. परंतु, यासाठी अजून बराच काळ जावू शकतो. कारण, सुरक्षा हा महत्त्वा मुद्दा आहे.
न्यूयॉर्क पासून झाली सुरुवात
यावर्षीच्या सुरुवातीला न्यूयॉर्क पोलीस डिपार्टमेंट म्हणजेच एनवायपीडीने घोषणा केली आहे. त्यांच्याकडून शहरातील पेट्रोलिंगसाठी आता रोबोटचा वापर करण्यात येणार आहे. तर सिंगापूरने घोषणा केली की, ते चांगी विमानतळावर ऑटोनोमस पोलिसाचा वापर करीत आहेत. द स्ट्रेट्स टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, रोबोट पोलीस कॅमेरे, सेन्सर, सायरनने सज्ज असणार आहे. सिंगापूर गेल्या पाच वर्षापासून या रोबोट्स सोबत ट्रायल रन करीत आहे.

वाचाः जपानचेही भारताच्या पावलावर पाऊल, गुगल आणि ॲपलचे वाढवले टेन्शन
सेन्सर कॅमेराने सज्ज असतील
पोलीस रोबोट जवळपास पाच फूट लांब असेल. यात अनेक कॅमेरे असतील. ज्यात ३६० डिग्री व्ह्यू मिळेल. त्यामुळे पोलीस अधिकारी पाहू शकतील की, शेवटी ग्राउंड रूटवर काय होत आहे. याशिवाय, पोलीस रोबोट मध्ये बिल्ट इन स्पीकर असेल. सोबत मायक्रोफोनची सुविधा असेल. त्यामुळे रोबोट सोबत बोलता येऊ शकते. याचाच अर्थ पोलीस पूर्णपणे पोलिसांसारखे काम करू शकतील. पोलीस रोबोटला सिंगापूरमध्ये पहिल्यांदा २०१८ मध्ये आणले गेले आहेत. चांगी विमानतळावर सिंगापूरचे काही वेळेपासून रोबोटिक टेक्नोलॉजीचा वापर केला जात आहे.
वाचाः Google बंद करतेय हे पॉप्यूलर फीचर, आजच सेव्ह करा डेटा, १९ जुलै अखेरची तारीख
वाचाः फक्त ९९९ रुपये खर्च करा आणि अनलिमिटेड डेटा, कॉलिंग सोबत OTT प्लान्स मिळवा