Top Mobile Brands देखील गोळा करत आहेत तुमचा डेटा, आताच मोबाईलमधील या सेटिंग्ज बदला, नाहीतर…

नवी दिल्ली : Smartphone Settings : वाढत्या स्मार्टफोनच्या वापरामुळे आपला खूप सारा डेटा हा मोबाईल कंपन्यांकडे जात आहे. यात रिअलमी, ओप्पो, वनप्लससारख्या आघाडीच्या मोबाईल ब्रँड कंपन्या असून या सर्वांविरुद्ध चौकशीचे आदेशही केंद्र सरकारने दिले आहेत. भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नोलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काही मोबाईल ब्रँड्सविरुद्ध चौकशीचे आदेश दिले असून युजर्सनाही या सेटिंग्स डिसेबल करायला सांगितल्या आहेत.तर अँड्रॉईड फोन्सचं जे फीचर चर्चेत आहे ते, म्हणजे Enhanced intelligent Service. हे फीचर Realme, OnePlus, Oppo या स्मार्टफोन्समधअये आधीपासूनच एनेबल असतं. या सेटिंगमुळेच युजर्सची खाजगी माहिती गोळा केली जात आहे. युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी हे फीचर्स असल्याचं सांगितलं जात आहे. तर समोर येणाऱ्या नेमक्या माहितीचा विचार केला तर, ColorOS, RealmeUI आणि OxygenOS च्या लेटेस्ट सेटिंगमध्ये हे Enhanced intelligent Service ऑन असतं. त्यामुळे जर तुम्ही या वरील ब्रँड्सपैकी कोणता ब्रँड वापरत असाल तर लगेचच या सेटिंगला डिसॅबल करा. कारण अधिक चांगला अनुभव देण्यासाठी कँलेडर, लोकेशन, SMS या सर्वाच्या मदतीने तुमचा डेटा गोळा केला जाण्याची शक्यता आहे.

वाचा : WhatsApp चे खास फीचर्स आहेत एकदम खास, अनेकांना माहितही नाहीत…

कशी कराल ही सेटिंग डिसॅबल?
जर तुम्ही ही Enhanced intelligent Service बंद केली तर काही गोष्टींचा वापर करताना तुम्हाला अडचण देखील येऊ शकते. पण तरी तुम्हाला ही सेटिंग बंद करायची असल्यास खालील स्टेप्स फॉलो करु शकता…
सर्वात आधी सेटिंगमध्ये जाऊन मग Additional Settings वर क्लिक करा. त्यानंतर यादी तील System Services हा पर्याय निवडा. त्यानंतर समोर Enhanced intelligent Service दिसतील ज्या तुम्ही डिसॅबल करु शकता. त्यानंतर एकदा फोन रिस्टार्ट करा.

वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?

Source link

mobile settingsOnePlusoppopersonal dataprivacy policyrealmeओप्पोमोबाईल सेटिंग्जवनप्लस
Comments (0)
Add Comment