फोन बंद करुन साफ करा
सर्वात आधी तर फोन खराब होणार नाही याची काळजी घ्या, स्वच्छ कॅमेरा लेन्स ठेवण्यासाठी सर्वात आधी म्हणजे फोनला धूळ पकडण्यापासून टाळण्यासाठी ते स्वच्छ ठिकाणी ठेवावे. तसंच
कॅमेरा लेन्स साफ करण्यापूर्वी तुमचा स्मार्टफोन बंद केल्याची खात्री करा. लेन्स साफ करताना फोन चालू असल्यास नुकसान होऊ शकते.
वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल
साफ करताना मऊ, स्वच्छ कपडा वापरा
साफ करताना फोनवरील कॅमेरा लेन्सेसवर स्क्रॅच पडण्याची शक्यता असते. असे होण्यापासून टाळण्यासाठी, नेहमी मऊ मायक्रोफायबर कापड वापरा. हे साफ करताना लेन्स स्क्रॅच होण्यापासून वाचवेल. तसंच लेन्सभोवती इतर अनेक गोष्टी असतात. ज्यात फ्लॅशलाइट, मायक्रोफोन आणि काही इतर सेन्सर्सचा समावेश असतो. कॅमेर्याची क्वॉलिटी चांगली ठेवण्यासाठी, कॅमेरा सिस्टमचे हे इतर भागही योग्यप्रकारे साफ करा.
वाचा :ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकव
लेन्स क्लिनर वापरा
लेन्स खूपच घाण झाली असल्यास, तुम्ही लेन्स क्लिनर वापरू शकता. मायक्रोफायबर कापडावर थोड्या प्रमाणात लेन्स क्लिनर लावा आणि लेन्स पुसून टाका. साफसफाईनंतर लेन्स पूर्णपणे कोरडी झाली आहे का? हे नक्की चेक करा. तसच एखादा पार्ट कपड्याने साफ करता येत नसेल तर मऊ-ब्रिस्टल ब्रश वापरा. जर तुम्ही मायक्रोफायबर कापडाचा वापर करून लेन्सच्या काही भागापर्यंत पोहोचू शकत नसाल, तर त्या भागात पोहोचण्यासाठी मऊ-ब्रिस्टेड ब्रश वापरा
वाचा : BSNL चा एक वर्षाचा रिचार्ज अगदी स्वस्तात, महिन्याला खर्च करा फक्त १२६ रुपये, दररोज मिळेल 2GB डेटा
लिक्विड क्लीनर थेट लेन्सवर लाऊ नका
तुम्ही ज्या ही लिक्विड क्लीनरने लेन्स साफ करत आहात, ते द्रव थेट लेन्सवर कधीही लावू नका. फोनच्या हे लिक्विड क्लिनिंग कपड्यावर लाऊन मगच फोनवर टाकावी, असं न केल्यास लेन्स खराब होण्याची फार अधिक शक्यता आहे.
वाचाः Google बंद करतेय हे पॉप्यूलर फीचर, आजच सेव्ह करा डेटा, १९ जुलै अखेरची तारीख
लेन्स साफ करताना नाजूक हात वापरा
लेन्स साफ करताना नाजूकपणाने लेन्सला साफ करा. कारण अधिक दाब देऊन साफ केल्यास लेन्स तुटण्याची किंवा तिच्यावर स्क्रॅच येण्याची शक्यता आहे. तसंच बोटांचे ठसे आणि तेलाचे डाग मोबाईल लेन्सवर लागणार नाहीत. याची काळजी घ्या. कारण यामुळे लेन्स अधिक खराब होऊ शकते. त्यामुळे चुकूनही लेन्सला स्पर्श करु नका आणि स्वच्छ कापड वापरा.
वाचा : समोरचा आपला कॉल रेकॉर्ड करतोय का? जाणून घेण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो?